शेतकरी उत्पादक कंपनी/शेतकरी गट यांना प्रकल्प उभारणीसाठी अर्थसहाय्य (पोकरा अंतर्गत)
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत- शेतकरी उत्पादक कंपनी/बचत गट/शेतकरी गट यांच्या व्यावसायिक प्रस्तावांना सहाय्य करणे- लाभार्थी पात्रता- 1)शेतकरी उत्पादक कंपनी/शेतकरी उत्पादक संघ 2) कोणत्याही यंत्रणे कडे नोंदणी झालेले शेतकरी /महिला/भूमीहीन व्यक्तींचे इच्छूक गट. ऊद्देश- शेतकरी उत्पादक कंपनी/शेतकरी गट यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने हा घटक राबविण्यात येत आहे. कोणते प्रकल्प उभारता येतील- भाडे तत्वावर कृषी औजारे सेवा केंद्र(CHC) कृषी उत्पादनाचे संकलन केंद्र/एकात्मिक पैक हाऊस पैक हाऊस गोदाम बांधकाम व छोटे वेअर हाऊस फळ पिकवणी केंद्र शीतगृह भाजीपाला/फळ प्रक्रिया केंद्र धान्य प्रक्रिया यूनिट(स्वच्छता/प्रतवारी यूनिट सह) अन्न प्रक्रिया यूनिट औषधी/सुगंधी वनस्पती प्रक्रिया यूनिट हळद प्रक्रिया यूनिट मसाले यूनिट दुध प्रक्रिया यूनिट कडधान्य मिल( दाल मिल) तेल गाळप यूनिट निंबोळी अर्क यूनिट रेफ्रिजरेटेड व्हँन किंवा भाजीपाला/फळे वाहतुकीसाठी वाहन/वाहन मार्केट आउटलेट(वातानुकूलित/कृषी मॉल) व्हेंडिंग कार्ट मूरघास यूनिट मधुमक्षिका पालन यूनिट शेळी पैदास केंद्र कांदा चाळ कृषी उत्पादनां...