Total Pageviews

नविन विहिर (पोकरा अंतर्गत)

नानाजी देशमुख  कृषि संजीवनी प्रकल्प - नवीन  विहीरी 


अ. योजनेत कोण सहभागी होऊ शकतात - 
ग्राम कृषि संजिवनी समितीने मान्यता दिलेले शेतकरी.

ब) अर्ज कुठे करावा - 
इच्छुक शेतकऱ्यांनी  https://dbt.mahapocra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी. 

क) आवश्यक कागदपत्रे - 
7/12 व 8 अ

ड) लाभार्थी पात्रता - 

१.  विहीर घेण्यासाठी एकूण जमिनीचे क्षेत्र ०.४० हेक्टर पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

२. संरक्षित सिंचनाची सोय उपलब्ध असलेले तसेच या घटकाचा इतर कोणत्याही योजनेतून यापूर्वी लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना लाभ देय नाही.

३. प्रस्तावित नवीन विहीर व पिण्याच्या पाण्याचा सार्वत्रिक स्त्रोत यातील अंतर ५०० मीटर पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

४. प्रस्तावित विहीर व अस्तित्वात असलेल्या इतर विहिरींचे अंतर १५० मीटर पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

५. गावामधील अस्तित्वातील व प्रस्तावित असे एकूण सिंचन विहिरींची घनता लागवडी योग्य क्षेत्राच्या ८ विहिरी प्रति चौरस किलोमीटर असणे आवश्यक आहे.

६. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

७. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या व्याख्येप्रमाणे अतिशोषित व शोषित पाणलोट क्षेत्रामध्ये विहिरी घेण्यास मनाई आहे.

८. नावीर विहीर खोदणे व अन्य बाबींची पूर्तता करण्यासाठी कमाल १ वर्षाचा कालावधी अनुज्ञेय आहे.


इ) अर्थसाहाय्य - १०० टक्के रुपये २.५० लाख. अनुदान थेट लाभार्थीच्या आधार कार्ड संलग्न बँक खात्यावर जमा करण्यात येते.