हरितगृह / हायब्रिड/ रिट्रैक्टेबल स्ट्रक्चर (राष्ट्रिय फलोत्पादन अभियान अंतर्गत)
राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत हरितगृह / हायब्रिड/ रिट्रैक्टेबल स्ट्रक्चर पॉलीहाऊस हाऊस उभारणी करणे
१. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी (https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin) या ऑनलाईन संकेतस्थळावर अर्ज करावेत.
लाभार्थी पात्रता-
- स्वतः च्या मालकीची जमीन असणे आवश्यक.
- स्वतः च्या मालकीची जमीन नसल्यास शेतकऱ्यांच्या आपसातील दुय्यम निबंधकाकडील किमान ११ वर्षांचा नोंदणीकृत भाडेपट्टा करार आवश्यक.
- वैयक्तिक शेतकरी/शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था/भागीदारी/निमशासकीय/स्वायत्त संस्था/शेतकरी उत्पादक कंपन्या/शेतकरी समूह व बचत गट यांना लाभ घेता येईल.
२. प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य First Come First Serve नुसार ऑनलईन प्रणालीद्वारे शेतकरी निवड होईल. निवड झालेले शेतकरी यांना निवडीबाबत मेसेज प्राप्त होइल.
३.आवश्यक कागदपत्रे- निवड झाल्यानंतर शेतकरी यांनी खालील कागदपत्रे ७ दिवसात अपलोड करावीत-
agristack ऍग्रीस्टॅक फार्मर आयडी (७/१२, ८अ ,आधार कार्ड ची आवश्यकता नाही)
वनपट्टाधारक शेतकरी असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र
चतु:सीमा नकाशा
.आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत
.जात प्रमाणपत्र (अनु.जाती/ अनु.जमाती शेतकऱ्यांसाठी)
.विहीत नमुन्यातील हमीपत्र प्रपत्र-१
बंधपत्र प्रपत्र-२
संमती पत्र प्रपत्र-३अ व ३ब
पाणी तपासणी अहवाल (शासकीय/मान्यताप्राप्त खाजगी प्रयोगशाळेचा)
प्रकल्प अहवालाची (DPR) आवश्यकता नाही
४. कागदपत्रांची छाननी व स्थळ पाहणी करून सहाय्यक कृषी अधिकारी हे ७ दिवसात करून महाडीबीटी वर अहवाल अपलोड करतील.
५. पूर्वसंमती-
तालुका कृषी अधिकारी हे पुढील ३ दिवसात पूर्वसंमती देतील.
शेतकऱ्यांना हरितगृहाचा आराखडा,आकारमानानुसार लागणारे साहित्य व त्याचे तांत्रिक निकष, साहित्याचे उत्पादन व पुरवठा करणाऱ्या नोंदणीकृत कंपन्यांची यादी तसेच सदर घटकांची उभारणी करणाऱ्या सेवा पुरवठादारांची यादी तसेच प्रशिक्षण संस्थांची यादी शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे तालुका कृषी अधिकारी यांचेकडून मिळेल. या नोंदणीकृत उत्पादक कंपन्या व सेवा पुरवठादाराकडूनच उभारणीचे काम करून घेणे अनिवार्य आहे.
पूर्वसंमती मिळाल्यानंतर १५ दिवसाच्या आत काम सुरु करावे व पूर्वसंमतीपासून १२० दिवसात पूर्ण करावे.
हरितगृह सांगाड्याची गुणवत्ता/दर्जाबाबत ५ वारंटीबाबत हमी सेवा पुरवठादाराची राहील.
हरितगृह उभारणीकरिता प्रामुख्याने IS 1161:2014(As per BIS Ammendment No.2) या मानांकनाच्या जीआय पाइपचा पुरवठा अधिकृत उत्पादक/वितरक यांनी करावयाचा आहे.
६. प्रशिक्षण-
या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारे शेतकरी यांना ३ ते ५ दिवसाचे तांत्रिक प्रशिक्षण अनिवार्य आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्याशिवाय अनुदान मिळत नाही. प्रशिक्षण संस्थानची यादी खालील प्रमाणे आहे-
- प्रेसिजन फार्मिंग डेव्हलपमेंट सेंटर (PFDC) , महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी
- पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला
- हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर तळेगाव दाभाडे
- महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे
- कृषी विज्ञान केंद्र बारामती
- कृषी विज्ञान केंद्र नाशिक
७. हरितगृह उभारणी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी सेवा पुरवठादाराचे साहित्य पुरवठा व उभारणी (वाहतूक व मजुरी सह) जीएसटी नोंदणी क्रमांक असलेले पक्के देयक व सेवापुरवठादाराचे साहित्याचे E-Way Bill अपलोड करावे. उभारणीपश्चात मंडळ कृषी अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकारी हे संयुक्तपणे अंतिम मोका तपासणी करतील.
८. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी स्तरावरून लाभार्थी यांच्या थेट बँक खात्यात DBT द्वारे अनुदान वर्ग करण्यात येईल
९. पॉलिहाऊसचे प्रकार (आकारमान ) व अनुदान मर्यादा -
अनुदान मर्यादा - प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के
क्षेत्र मर्यादा-२५०० चौ. मी./ लाभार्थी (यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेत लाभ घेतलेले क्षेत्र धरून)
१. फेंन पैड सिस्टिम -वातावरण नियंत्रित पॉलीहाउस (HPCC)
२. ट्यूबूलर/रेक्टेंगुलर स्ट्रक्चर -नैसर्गिक वायुविजन पॉलीहाउस (HPVO)
३. बांबू /केबल पर्लिन स्ट्रक्चर -
खर्चाच्या ५० टक्के अनुदान
मापदंड-रु.४५० /चौ.मी. -अधिसूचित क्षेत्राकरिता १५ टक्के अधिक मापदंड
क्षेत्र मर्यादा-२५०० चौ. मी./ लाभार्थी
एका लाभार्थीस जास्तीत जास्त २० स्ट्रक्चर चा लाभ घेता येईल.
एका स्ट्रक्चरचे क्षेत्र २०० चौ.मी. पेक्षा जास्त नसावे.
अधिक माहिती साठी-