Posts

Showing posts with the label nhm

Total Pageviews

मधूमक्षिका पालन (राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत)

राष्ट्रिय फलोत्पादन अभियान अंतर्गत- *मधुमक्षिका पालन* मधमाशा फुलातील मध गोळा करताना अप्रत्यक्षपणे परागी करणाचे मोठे कार्य करतात. यामुळे उत्पादनात वाढ होते. तसेच मधमाशां पासून मध, मेण यासारखी उत्पादने देखील मिळतात. त्यामुळे मधुमक्षिका पालनाद्वारे दुहेरी फायदा मिळतो. राज्यात खादी ग्रामोद्योग विकास महामंडळ ,केंद्रीय मधुमक्षिका पालन आणि प्रशिक्षण केंद्र संस्था कार्यरत आहेत. त्यांचे कडून तांत्रिक मार्गदर्शन व प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाते. राष्ट्रिय फलोत्पादन अभियान अंतर्गत खालील बाबीं साठी अनुदान मिळते. i )  न्यूक्लियस स्टॉक चे उत्पादन- न्यूक्लियस स्टॉक चे उत्पादन साठी सार्वजनिक क्षेत्रा साठी १०० टक्के कमाल रु. २० लाख अनुदान आहे.  ii ) बी ब्रीडर कडून मधुमक्षिका वसाहतीचे उत्पादन करणे साठी अनुदान- मधुमक्षीका वसाहती चे उत्पादन करण्यासाठी बी ब्रीडर ला (सार्वजनिक/खाजगी/सहकारी संस्था/व्यक्ती/महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ) शासनाने निर्धारित केलेले प्राधिकारी (एस डी ए) यांचे कडे नोंदणी करणे आवश्यक आहे. बी ब्रीडर कडे कमीत कमी 150 रिकामे बी बॉक्सेस,  50 न...

सामूहिक शेततळे ( एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत)

                   एकात्मिक  फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सामूहिक  शेततळे अ. योजनेत कोण सहभागी होऊ शकतात - १. लाभार्थी हे शेतकरी असावेत.  २. शेतकरी समूहाकडे फलोत्पादन पिके असणे आवश्यक आहे. ३. समूहात २ किंवा अधिक शेतकरी असावेत. शेतकरी संयुक्त कुटुंबातील नसावेत. शेतकऱ्यांचे जमीन धारणेबाबतचे ७/१२ खाते उतारे स्वतंत्र असावेत.   ब) अर्ज कुठे करावा -   इच्छुक शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करावा .  क) आवश्यक कागदपत्रे -  Agristack शेतकरी नोंदणी क्रमांक  (Farmer Id ),  ७/१२ फलोत्पादनाच्या नोंदिसह ,  (अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती संवर्गातील शेतकरी यांना फलोत्पादन पिके सध्या असण्याची अट शिथिल आहे. मात्र संबंधीत शेतकरी यांनी भविष्यात फलोत्पादन पिके घेण्यावीषयी हमी पत्र द्यावे.) ८ अ,  आधार कार्ड,  आधार संलग्न राष्ट्रीयीकृत बैंक खाते पासबूक च्या प्रथम पानाची छायांकीत प्रत,  विहित नमुन्यातील हमिपत्...

हरितगृह/शेडनेट मध्ये लागवड (राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत)

राष्ट्रिय फलोत्पादन अभियान -  हरितगृह व शेडनेट मध्ये लागवड साहित्य व मशागतीसाठी अनुदान-                                                          अ ) क्षेत्र मर्यादा  -  एका लाभार्थ्यास हरितगृह व शेडनेट मध्ये लागवड साहित्य व मशागतीसाठी अनुदान जास्तीत जास्त २५०० चौ. मीटर क्षेत्र मर्यादा पर्यंत लाभ घेता येईल.  यापूर्वी कोणताही शासकीय योजने अंतर्गत लाभ घेतला असल्यास सर्व योजना मिळून प्रति लाभार्थी जास्तीत जास्त २५०० चौ. मीटर क्षेत्र मर्यादा पर्यंतच लाभ अनुज्ञेय  राहील.                             ब) अर्ज कुठे करावा -  इच्छुक शेतकऱ्यांनी  https//mahadbt.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.                    ...

संकलन,प्रतवारी व पैकिंग केंद्र (राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत)

फलोत्पादीत मालाचे संकलन ,  प्रतवारी व पैकिंग केंद्राची उभारणी (Functional infrastructure for collection sorting/grading, packing units etc.)- उद्देश- विविध प्रकारची फळे, भाजीपाला व इतर फलोत्पादीत उत्पादने हंगामी व नाश वंत स्वरुपाची आहेत. हंगामात शेतकरी यांना वैयक्तीक रित्या या मालाची बाजारातील मागणी नुसार प्रतवारी, मुल्य वर्धन/पैकिंग करुन बाजारात पाठविणे शक्य होत नाही तसेच आर्थिक दृष्ट्या किफायतशीर ही ठरत नाही. यामुळे शेतकरी यास आपल्या मालाचा उचित मोबदला मिळत नाही. शेतकरी यांनी उत्पादित केलेल्या मालाचे एकत्रित संकलन व मुल्य वर्धन करुन थेट प्रक्रिय उदयोजक/निर्यात दार/टर्मिनल मार्केट/केंद्रीय लिलाव केंद्र या बाजार पेठेत एकत्रित पणे उपलब्ध करुन दिल्यास शेतकरी यांना आपल्या मालाच रास्त मोबदला मिळणे शक्य आहे. या अनुषंगाने ग्रामीण भागात अशा संकलन व प्रतवारी व पैकिंग केंद्राची उभारणी करणेसाठी अर्थ सहाय्याची योजना योजना राबविण्यात येत आहे. अशा प्रकारच्या केन्द्रामूळे शेतकरी यांना बाजारपेठेच्या मागणी नुसार उत्पादन आराखडा प्रवृत्त करणे व त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान प्रशिक्षण/ विस्तार...

स्थायी/फिरते विक्री केंद्र-शीत चेंबर च्या सुविधेसह (राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत)

राष्ट्रिय फलोत्पादन अभियान अंतर्गत- स्थायी/फिरते विक्री केंद्र-शीत चेंबर च्या सुविधेसह (Static/Mobile Vending Cart/Platform with cool chamber) ऊद्देश- ग्राहकांच्या सुविधेसाठी लोकवस्तीमध्ये/लोक वस्ती जवळ कमी खर्चाचे स्थायी/फिरते भाजीपाला विक्री हातगाडी/केंद्र स्थापन करुन योग्य दारामध्ये आणि आवश्यक त्या वेळेस ग्राहकांना फळे व भाजीपाला पूरवणे हा या योजने चा उद्देश आहे. या योजने मध्ये कूल चेंबर च्या सुविधे सह हातगाडी, विक्री कट्टा, वजन काटे इ .भांडवली खर्च अनुदानासाठी ग्राह्य धरला जाइ ल. माप दंड-  अधिकतम ग्राह्य प्रकल्प खर्च- रु ३०००० /-. अर्थ सहाय्याचे स्वरुप- कूल चेंबर च्या सुविधे सह स्थायी/फिरते विक्री केंद्र स्थापन करण्यासाठी येणारे खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल रु.१५०००/- इतके अनुदान देय आहे. पात्र लाभार्थी- वैयक्तीक लाभार्थी, स्वयं सहाय्य महिला/पुरुष बचत गट, उत्पादकांच्या सहकारी संस्था, फलोत्पादं संघ, स्वयं सहायता गट -ज्यामध्ये किमान 25 सदस्य असतील, शेतकरी महिला गट तसेच सार्वजनिक क्षेत्रातील नोंदणी कृत कंपन्या इ . अर्ज कुठे करावा- तालुका कृषी अध...

वातावरण नियंत्रीत रिटेल बाजार/ किरकोळ विक्री दालन (राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत)

वातावरण नियंत्रीत रिटेल बाजार / विक्री दालन (Environmentally controlled Retail Markets/Outlets)- उद्देश- वाढणारे शहरीकरण, शहरां मधिल व्यक्तींचे वाढते उत्पन्न, जीवन शैली इ .मुळे देशात रिटेल मार्केट ची वाढ होत आहे. अशा प्रकारच्या रिटेल मार्केट मधून फलोत्पादीत उत्पन्नाची सुविधा असलेली दालने सुरु करण्याच्या दृष्टीकोनातून तसेच स्वतंत्ररित्याही अशी दालने सुरु करण्याच्या दृष्टीकोनातून सदरील योजना राबविण्यात येत आहे. सदर योजने अंतर्गत अनुदानासाठी भांडवली खर्च ग्राह्य धरला जाइल.उदा.बांधकाम, शीत साखळी सुविधा, ईलेक्ट्रॉनीक वजन काटे, प्लास्टीक क्रेटस, तापमान नियंत्रण यंत्रणेसह रैकस इ . माप दंड-  अधिकतम  ग्राह्य प्रकल्प खर्च- रु.२० लाख प्रती यूनिट. अर्थसहाय्याचे स्वरुप-  वातावरण नियंत्रीत रिटेल बाजार/ विक्री दालन उभारणी करण्यासाठी येणारे खर्चाच्या सर्व साधारण क्षेत्रा साठी  ३५ टक्के किंवा कमाल रु.७ लाख अर्थ साह्य देय आहे. अधिसूचीत क्षेत्रा साठी खर्चाच्या ५० टक्के किं वा कमाल रु.१० लाख अर्थ साह्य देय आहे. पात्र लाभार्थी-   अ. वैयक्तीक...

अपनी मंडी / ग्रामीण बाजार/थेट बाजार (राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत)

अपनी मंडी/ ग्रामीण बाजार/थेट बाजार (Rural Markets/Apni Mandies/Direct Markets) उद्देश- फलोत्पादीत उत्पादने ही नाश वंत स्वरुपाची असुन त्यांची तात्काळ विक्री होणे आवश्यक असते. मध्यस्थांचे वर्चस्व कमी करुन शेतकरी यांना जादा पैसे मिळवून देण्यासाठी तसेच ग्राहकासही वाजवी किमतीत शेतिमाल उपलब्ध करुन देण्यासाठी शेतकरी यांना शेतिमाल विक्रीसाठी सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. या उद्देशाने ही पणन सुविधा उभारणीसाठी अर्थ्साह्याची योजना राबविण्यात येत आहे. सदर योजने अंतर्गत ग्राम स्तरापासून जिल्हा स्तरा पर्यंत ग्रामीण बाजार/थेट बाजार/अपनी मंडी यासाठी विक्रीसाठी ओटे,शेड व गाळे बांधणे, शीत गृहा द्वारे किंवा इतर योग्य पद्धतीची साठवण क्षमता निर्माण करणे, मालाची प्रतवारी, पैकिंग, मोजमाप, लिलाव केंद्र, सांडपाणी व्यवस्था, टाकाऊ मालाचा निचरा/चक्रीकरण सुविधा, पिण्याचे पाणी इ .सूविधा स्थापन करण्या साठी अर्थ सहाय्य देय राहिल.   माप दंड-  अधिकतम  ग्राह्य प्रकल्प खर्च- रु.२५ लाख. अर्थसहाय्याचे स्वरुप-  ग्रामीण बाजार/अपनी मंडी/ थेट बाजार यासाठी येणारे खर्चाच्या  ...

रायपनींग चेंबर (ripening chamber) (राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत)

रायपनींग चेंबर (Ripening chamber)- उद्देश- 1. इथिलीन सारख्या नैसर्गिक सम्प्रेरकाचा (natural hormone) वापर करुन केळी, आंबा, पपई इ .फळपीकांना गरजे नुसार पिकवता येते. 2. फळांतील रस, गर  साल इ .एक संघ पिकत असल्यामूळे फळांचा टिकाऊ पणा वाढतो. 3.फळांच्या वजना मध्ये कमीत कमी घट आणि फळांची गोडी, चव व आकर्षक पणा वाढतो. माप दंड-  अधिकतम  ग्राह्य प्रकल्प खर्च- रु.१ लाख प्रती मे. टन आणि प्रती यूनिट कमाल प्रकल्प क्षमता- 300 मे.टन. अर्थसहाय्याचे स्वरुप-  सर्व साधारण क्षेत्रा साठी साठवण क्षमता विचारात घेउन ग्राह्य भांडवली प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के किंवा कमाल रु.१०५ लाख अर्थ साह्य देय आहे. अधिसूचीत क्षेत्रा साठी साठवण क्षमता विचारात घेउन ग्राह्य भांडवली प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल रु.१५० लाख अर्थ साह्य देय आहे. अर्थ सहाय्यासाठी भांडवली खर्चाच्या बाबी ग्राह्य धरण्यात येतात. पात्र लाभार्थी-   अ. वैयक्तीक लाभार्थी-  वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी सदर अर्थ साह्य हे बँक कर्जाशी निगडित असून (credit linked back ended subsidy) ...

प्राथमिक प्रक्रिया केंद्र (राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत)

प्राथमिक प्रक्रिया केंद्र (primary/mobile processing unit)- प्राथमिक प्रक्रियेमध्ये काजू प्रक्रिया केंद्र, वाळवणे, पल्प काढणे,भूकटी  करणे इ .तसेच बेदाना तयार करणे, नैसर्गिक रंग, सुगंधी तेल इ . सुका भाजीपाला व फळे, ताजी कापलेली फळे व भाजीपाला, औषधी व सुगंधी वनस्पती यांचे पैकिंग,पल्पींग व कैनींग, हळद प्रक्रिया हळद कूकर  इ .घटकांचा विचार होवू शकतो. उद्देश- 1.फळे, फुले, भाजीपाला, औषधी व सुगंधी वनस्पती यासारख्या नाश वंत मालाचे दर्जा व आयुष्य वाढविने. 2. कच्चा माल प्रक्रिया करुन गुणात्मक वाढ/ मुल्य वर्धन करण्या साठी चालना देणी. माप दंड व अर्थसहाय्याचे स्वरुप-  अधिकतम  ग्राह्य प्रकल्प खर्च- रु.३५ लाख. सर्व साधारण क्षेत्रा साठी साठवण क्षमता विचारात घेउन ग्राह्य भांडवली प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के किंवा कमाल रु.१२.२५ लाख अर्थ साह्य देय आहे. अधिसूचीत क्षेत्रा साठी साठवण क्षमता विचारात घेउन ग्राह्य भांडवली प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल रु.१७.५० लाख अर्थ साह्य देय आहे. अर्थ सहाय्यासाठी भांडवली खर्चाच्या बाबी ग्राह्य धरण्यात येतात. पात्र लाभा...

शीत वाहन (refrigerated transport vehicle) (राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत)

शीत वाहन (Refrigerated Transport Vehicle)- उद्देश- १.वाहतुकी दरम्यान फळे, फुले, भाजीपाला, औषधी व सुगंधी वनस्पती यासारख्या नाश वंत मालाचे दर्जा टिकवुन ठेउन आयुष्य वाढविणे व होणारे नुकसान टाळणे. २. वाहन खरेदी तसेच वाहनावर उपलब्ध करुन घ्यावयाच्या रेफ्रिजरेशन व इतर अनुषंगिक सुविधांसाठी अनुदान देय राहिल. माप दंड व अर्थसहाय्याचे स्वरुप-  अधिकतम  ग्राह्य प्रकल्प खर्च- रु. ३१ लाख. सर्व साधारण क्षेत्रा साठी साठवण क्षमता विचारात घेउन ग्राह्य भांडवली प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के किंवा कमाल रु. १०.८५ लाख अर्थ साह्य देय आहे. डोंगराळ व अधिसूचीत क्षेत्रा साठी साठवण क्षमता विचारात घेउन ग्राह्य भांडवली प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल रु.१५.५० लाख अर्थ साह्य देय आहे. अर्थ सहाय्यासाठी भांडवली खर्चाच्या बाबी ग्राह्य धरण्यात येतात. कमाल क्षमता-१४ मे.टन  आणि लहान क्षमतेसाठी यथा प्रमाणा आधारे (pro-rata basis) परंतु ४   मे.टन पेक्षा कमी नाही.  पात्र लाभार्थी-   अ. वैयक्तीक लाभार्थी-  वैयक्ति...

नविन तंत्रज्ञान राबवीणे व शीतसाखळी आधुनिकीकरण (राष्ट्रिय फलोत्पादन अभियान अंतर्गत)

नविन तंत्र ज्ञान राबविणे / शीत गृह  आधुनिकीकरण (Technology induction and modernization of cold storage)- समाविष्ट बाबी- शीत साखळी आधुनिकीकरणामध्ये PLC उपकरणे, पैकेजींग लाइन्स, डॉक लेवलर्स, अडवान्सड ग्रेडर्स, पर्यायी तंत्रज्ञान, स्टैकींग पद्धत, आधुनिकी करण, इन्सुलेशन आणि रेफ्रिजरेशन या बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे. माप दंड - १. कमाल रु. १२५ लाख परंतु रेफ्रिजरेशन साठी रु. ३०००/मे . टन क्षमतेपेक्षा जास्त नाही.  २.   कमाल रु. १२० लाख परंतु इन्शुलेशन  साठी रु. १८००/मे . टन क्षमतेपेक्षा जास्त नाही अर्थसहाय्याचे स्वरुप-  सर्व साधारण क्षेत्रा साठी साठवण क्षमता विचारात घेउन ग्राह्य भांडवली प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के  अर्थ साह्य .  अधिसूचीत क्षेत्रा साठी साठवण क्षमता विचारात घेउन ग्राह्य भांडवली प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के  अर्थ साह्य . अर्थ सहाय्यासाठी भांडवली खर्चाच्या बाबी ग्राह्य धरण्यात येतात. पात्र लाभार्थी-   अ. वैयक्तीक लाभार्थी-  वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी सदर अर्थ साह्य हे बँक कर्जाशी निगडित असून...

शीतगृह (नविन, विस्तारीकरण, आधुनिकीकरण) (cold storage) (राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत)

शीतगृह (नविन, विस्तारीकरण, आधुनिकीकरण) (cold storage- construction , expansion, modernization)- फळे, फुले, भाजीपाला , औषधी व सुगंधी वनस्पती यासारख्या नाशवंत मालाचा दर्जा कायम ठेउन आयुष्य वाढविणे, प्रक्रिया प्रकल्प धारकांना वर्ष भर कच्च्या मालाचा पुरवठा करणे यासाठी शीत गृह आवश्यक असते. माप दंड व अर्थसहाय्याचे स्वरुप-  नविन शीतगृह कमाल रु.१२००० प्रती मे.टन  हा माप दंड आहे. या खर्चाच्या सर्व साधारण क्षेत्रा साठी साठवण क्षमता विचारात घेउन ग्राह्य भांडवली प्रकल्प खर्चाच्या ३५  टक्के किंवा कमाल रु.२१० लाख अर्थ साह्य देय आहे. डोंगराळ व अधिसूचीत क्षेत्रा साठी साठवण क्षमता विचारत घेउन ग्राह्य भांडवली प्रकल्प खर्चाच्या ५०टक्के किंवा कमाल रु.३०० लाख अर्थ साह्य देय आहे. अर्थ सहाय्यासाठी भांडवली खर्चाच्या बाबी ग्राह्य धरण्यात येतात. प्रती लाभार्थी जास्तीत जास्त 5000 मे.टन क्षमते पर्यंतच्या शीत गृहा साठी अनुदान देय आहे. एन एच बी च्या तांत्रिक प्रमाणका प्रमाणे शीत गृहाची उभारणी करावी. पात्र लाभार्थी-   अ. वैयक्तीक लाभार्थी-  वैयक्तिक ...

फिरते पुर्व शीतकरण केंद्र (mobile precooling unit) (राष्ट्रिय फलोत्पादन अभियान अंतर्गत)

फिरते पुर्व शीतकरण केंद्र (Mobile precooling unit)- फिरते पुर्व शीतकरण केंद्र हे फिरते केंद्र असुन शेतकरी यांच्या शेतावर जाउन फलोत्पादीत, औषधी व सुगंधी वनस्पती मालाचे पुर्व शीतकरण करणे अपेक्षीत आहे. फलोत्पादीत, औषधी व सुगंधी वनस्पती मालाची काढणी झाल्यानंतर/प्राथमिक प्रक्रिया केल्यानंतर त्यातील उष्णता (field heat)कमी करणे आणि आवश्यक्तेनुसार पुढिल कार्यवाही करणे तसेच फलोत्पादीत, औषधी व सुगंधी वनस्पतीचा टिकाउपणा वाढविणे यासाठी पुर्व शीतकरण केन्द्राची आवश्यकता असते. अर्थसहाय्याचे स्वरुप-   अधिकतम ग्राह्य प्रकल्प खर्च- रु.३० लाख. प्रती यूनिट प्रकल्प क्षमता - 6 मे.टन सर्व साधारण क्षेत्रा साठी साठवण क्षमता विचारत घेउन ग्राह्य भांडवली प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के किंवा कमाल रु.१०.५० लाख अर्थ साह्य देय आहे. अधिसूचीत क्षेत्रा साठी साठवण क्षमता विचारत घेउन ग्राह्य भांडवली प्रकल्प खर्चाच्या ५०टक्के किंवा कमाल रु.१५ लाख अर्थ साह्य देय आहे. अर्थ सहाय्यासाठी भांडवली खर्चाच्या बाबी ग्राह्य धरण्यात येतात. पात्र लाभार्थी-   अ. वैयक्तीक लाभार्थी-  ...

शीत खोली (स्टेजीँग) cold room (staging) (राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत)

शीत खोली (स्टेजींग)  cold room (staging)- अर्थसहाय्याचे स्वरुप-   अधिकतम ग्राह्य प्रकल्प खर्च- रु. ५२ लाख प्रती यूनिट.. प्रती यूनिट कमाल प्रकल्प क्षमता - 30 मे.टन सर्व साधारण क्षेत्रा साठी साठवण क्षमता विचारत घेउन ग्राह्य भांडवली प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के किंवा कमाल रु.१८.२० लाख अर्थ साह्य देय आहे. अधिसूचीत क्षेत्रा साठी साठवण क्षमता विचारत घेउन ग्राह्य भांडवली प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल रु.२६ लाख अर्थ साह्य देय आहे. अर्थ सहाय्यासाठी भांडवली खर्चाच्या बाबी ग्राह्य धरण्यात येतात. पात्र लाभार्थी-   अ. वैयक्तीक लाभार्थी-  वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी सदर अर्थ साह्य हे बँक कर्जाशी निगडित असून (credit linked back ended subsidy) बँक कर्जाच्या परताव्याच्या स्वरूपात देय  आहे. ब. इतर लाभार्थी -  राज्य सहकारी संस्था, सहकारी, नोंदणीकृत संस्था, विश्वस्त संस्था, फलोत्पादन संघ, स्वयंसहायता गट (ज्यामध्ये किमान २५ सदस्य असतील), शेतकरी महिला गट, सार्वजनिक क्षेत्रातील नोंदणीकृत कंपन्या  या संस्था/कंपन्यांना...

पुर्व शीतकरण केंद्र (precooling unit ) (राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत)

पुर्व शीतकरण केंद्र (precooling unit)- फलोत्पादीत, औषधी व सुगंधी वनस्पती मालाची काढणी झाल्यानंतर/प्राथमिक प्रक्रिया केल्यानंतर त्यातील उष्णता (field heat)कमी करणे आणि आवश्यक्तेनुसार पुढिल कार्यवाही करणे तसेच फलोत्पादीत, औषधी व सुगंधी वनस्पतीचा टिकाउपणा वाढविणे यासाठी पुर्व शीतकरण केन्द्राची आवश्यकता असते. मापदंड -    अधिकतम ग्राह्य प्रकल्प खर्च- रु.५ लाख/मे .टन  प्रती यूनिट प्रकल्प  क्षमता - 6 मे.टन अर्थसहाय्याचे स्वरुप-    सर्व साधारण क्षेत्रा साठी साठवण क्षमता विचारत घेउन ग्राह्य भांडवली प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के  अर्थ साह्य . अधिसूचीत क्षेत्रा साठी साठवण क्षमता विचारत घेउन ग्राह्य भांडवली प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के अर्थ साह्य. अर्थ सहाय्यासाठी भांडवली खर्चाच्या बाबी ग्राह्य धरण्यात येतात. पात्र लाभार्थी-   अ. वैयक्तीक लाभार्थी-  वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी सदर अर्थ साह्य हे बँक कर्जाशी निगडित असून (credit linked back ended subsidy) बँक कर्जाच्या परताव्याच्या स्वरूपात देय  आहे. ब. इतर लाभार्...

एकात्मिक पैक हाऊस (राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत)

राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत - एकात्मिक पैक हाऊस- फलोत्पादीत, औषधी व सुगंधी वनस्पती मालाची काढणी झाल्यानंतर/प्राथमिक प्रक्रिया केल्यानंतर त्यांचे आवश्यकतेनुसार प्रतवारी व पैकिंग करुन पुढिल कार्यवाही करणे, तसेच फलोत्पादीत, औषधी व सुगंधी वनस्पतीचा टिकाउपणा वाढविणे यासाठी एकात्मिक पैक हाऊस ची आवश्यकता असते. एकात्मिक पैक हाऊस बाबत माहिती- यामध्ये फळपीके,फूलपीके, भाजीपाला, औषधी व सुगंधी वनस्पती यांच्या आवश्यकतेप्रमाणे किमान 500-600 मे.टन प्रती वर्ष या क्षमतेच्या एकात्मिक पैक हाऊस ची उभारणी करणे अपेक्षीत आहे. यामध्ये फळपिकांच्या व वनस्पतींच्या आवश्यकते प्रमाणे स्वच्छता, प्रतवारी, उत्पादनाचे मुळ रुपात बदल न करता काढणी पश्चात प्रक्रिया पैकिंग, सिलिंग, यासाठी आवश्यक असणारी यंत्रसामुग्री (कनव्हेयर बेल्ट, वाशिंग व ड्राइंग यार्ड आणि भारत्तोलन इ .), क़च्चा माल व तयार मालासाठी साठवणूक सुविधा, हाताळणी साठी आवश्यक यंत्रणा  (ट्रॉली, प्लास्टीक क्रेटस, लिफ्टर्स इ .), पाण्याची सुविधा, टाकाऊ पदार्थांचा निचरा अथवा पुनर्वापर करणारी यंत्रणा या बाबींचा समावेश राहिल. अर्थसहाय्य-...

जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन (राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत)

राष्ट्रीय फलोत्पादन  अभियान अंतर्गत  जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करून उत्पादकतेत वाढ करणे     योग्य मशागत पद्धतीचा अवलंब न करणे, नांग्या न भरणे, खते व औषधाचा वापर न करणे, झाडांना व्यवस्थित आकार न देणे इत्यादी बाबीमुळे फळबागांची उत्पादकता कमी होते.  १. सदर योजनेचा  लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी  (http://www.mahadbt.maharashtra.gov.in)  या ऑनलाईन संकेतस्थळावर नोंदणी करावी.  २. ऑनलाईन  नोंदणी करतांना आवश्यक असणारे कागदपत्रे  अ . ७/१२ ब.   ८ अ  क.  आधार कार्डाची छायांकित प्रत  ड. आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत इ. जातीचा प्रमाणपत्र (अनु.जाती/ अनुजमाती शेतकऱ्यांसाठी) ई. यापूर्वी कोणत्याही योजनेतून लाभ घेतला नसल्याबाबतचे हमीपत्र ई. पासपोर्ट फोटो मापदंड - एकूण रु. ६००००/- प्रति हेक्टर.  (मृत फांदया /वृक्ष काढणे-रु. १००००/हे.  नांग्या भरणे- रु. १००००/हे.  निविष्ठा वापर- रु. ४००००/हे. ) ३. अर्थसहाय्य - ...

फलोत्पादन यांत्रिकीकरण (राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत)

राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत यांत्रिकीकरण १. अर्ज कुठे करावा- सदर योजनेचा  लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी  (http://www.mahadbt.maharashtra.gov.in)  या ऑनलाईन संकेतस्थळावर नोंदणी करावी.  २. ऑनलाईन  नोंदणी करतांना  कोणती  कागदपत्रे आवश्यक आहेत- अ. विहित नमुन्यातील अर्ज  ब. ७/१२ चा उतारा (फलोत्पादनाच्या नोंदीसह) क. आधार कार्डाची छायांकित प्रत ड. आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत इ. जातीचा प्रमाणपत्र (अनु.जाती/ अनुजमाती शेतकऱ्यांसाठी) ई. हमीपत्र ३.  यांत्रिकीकरण  अंतर्गत कोणत्या प्रकारच्या अवजारांना अनुदान देण्यात येते- या अंतर्गत ट्रॅक्टर, पॉवर टिलर, मॅन्युअल स्प्रेअर-नॅपसॅक/फूट स्प्रेअर, पॉवर नॅपसॅक स्प्रेअर, पॉवर संचलीत तैवान स्प्रेअर, ट्रॅक्टर चलित स्प्रेअर, इको-फ्रेंडली लाईट ट्रॅप  ही संयंत्रे समाविष्ट आहेत.  ४. लाभार्थी शेतकरी यांना अर्थसाह्य किती मिळते-  अज/अजा/अल्प/अत्यल्प/महिला करीता  किमतीच्या ५० टक्के,  आणि इतर लाभार्थी  यांना किमतीच्या ४० टक्केअर्थसाह्य देण्यात...