ठिबक व तुषार सिंचन (पोकरा 2.0 अंतर्गत)
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प-
अ ) लाभार्थी निवडीचे निकष काय आहेत -
५ हेक्टरपर्यंत जमीन धारणा असलेले शेतकरी. स्वत:चे नावे ७/१२ व ८अ असावा. सामायिक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र आवश्यक.
शेतकरी यांचेकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध असावी. सामुहिक सिंचनाची सुविधा उपलब्ध अस्ल्यास इतर संबंधितांचे करार पत्र आवश्यक.
ब) अर्ज कुठे करावा -
इच्छुक शेतकऱ्यांनी https//dbt.mahapocra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
पूर्व संमती प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसाच्या आत कृषि विभागा कडील नोंदणी कृत वितरक यांचे कडून सूक्ष्म सिंचन संच खरेदी करावा व उभारणी करुन कार्यान्वीत करावा.
कंपनी प्रतिनिधी व त्यांचे वितरकाने तांत्रिक दृष्ट्या योग्य आराखड्या प्रमाणे संच बसविण्याची कार्यवाही करावी. संचातील घटक हे केंद्र शासनाने विहित केलेल्या BIS दर्जाचे असणे बंधनकारक आहे.
क)आवश्यक कागदपत्र-
कंपनी प्रतिनिधीने तयार केलेला सूक्ष्म सिंचन आराखडा व प्रमाणपत्र, नोंदणीकृत सूक्ष्म सिंचन उत्पादक कंपनीच्या अधिकृत वितरकाचे कोटेशन
ड )सूक्ष्म सिंचन घटकामध्ये अनुदानासाठी कोणकोणत्या बॉबी समाविष्ट आहेत-
ठिबक सिंचन- इनलाइन व ऑनलाइन
तुषार सिंचन (सूक्ष्म तुषार सिंचन, मिनी तुषार सिंचन, चल तुषार सिंचन, रेनगन )
इ ) अनुदान -
अल्प/अत्यल्प भूधारक शेतकरी (२ हेक्टर पर्यंत )- ८० टक्के अनुदान
इतर शेतकरी (२.०१ हेक्टर ते ५ हेक्टर जमीन असणारे )- ७५ टक्के अनुदान
अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकरी- ९० टक्के अनुदान
देय अनुदान मिळणे साठी लाभार्थीने ऑनलाईन मागणी करावी व पाणी व मृद नमुने तपासणी अहवालासह विक्रेते/वितरक यांचेकडील बिलांची देयके स्वस्वाक्षांकित करुन ऑनलाईन अपलोड करावीत.
ई ) क्षेत्र मर्यादा-
५ हे. पर्यंत लाभ मिळेल . यापूर्वी लाभ घेतला असल्यास उर्वरित क्षेत्रासाठी ५ हेक्टरपर्यंत लाभ मिळेल.
फ) ठिबक संचासाठी मापदंड/हे. -
१.५ x १.५ मी - ९७२४५ रु,
१.२ x ०.६० मी - १२७५०१ रु.
१.५ x ०.६० मी. - १०९५३१ रु.
१.८ x ०.६० मी. - ९१५६० रु.
२ x २ मी. - ८३०८५ रु.
२.५ x ०.६० मी. - ७१७३३ रु.
२.५ x २.५ मी.- ६८२३४ रु.
३ x ३ मी. - ४७७५१ रु.
४ x ४ मी. - ४१५३४ रु.
५ x ५ मी - ३९३७८ रु.
६ x ६ मी - ३४६८७ रु.
८ x ८ मी. - २८७७७ रु.
९ x ९ मी. - २७३०४ रु.
१० x १० मी - २६१८१ रु.
१२ x १२ मी- २४५८६ रु.
ग ) तुषार संचा साठी मापदंड (१ हेक्टर पर्यन्त) चल स्प्रिंकलर पोर्टेबल -
७५ मिमी पाइप करिता रु.२४१९४ /-
६३ मिमी पाइप करिता रु. २१५८८ /-
सर्वसाधारण सुचना-
शेतकऱ्याने कंपनीच्या तांत्रिक प्रतिनिधीमार्फत दिलेला आराखडा व डिझाइन नुसार वितरकाकडून साहित्य घेऊन संचाची उभारणी करून घ्यावी.
सदर आराखडा तांत्रिकदृष्ट्या योग्य आणि किफायतशीर आहे असे कंपनी प्रतिनिधीची सही असलेल्या प्रमाणपत्रासह आराखडा देखील शेतकऱ्याने घ्यावा. (परिशिष्ट-६)
तसेच वितरकाकडून घेतलेल्या सूक्ष्म सिंचन साहित्याचे देयक कंपनी प्रतिनीधि यांच्या प्रतिस्वाक्षरीसह (जीएसटी क्रमांकासह ) देयकाची प्रत व आरखड्याची प्रत प्रकल्पाच्या पोर्टलवर अपलोड करावी.
काम पूर्ण झाल्यानंतर कार्य पूर्णत्वाचा दाखला अपलोड करावा. (परिशिष्ट-५)
तुषार सिंचन संचाचे पाइप चे जोडावर, फिमेल पार्ट वर एम्बोसींग करुन पुढिलप्रमाणे मजकुर लिहावा- "शेतकरी नाव, गाव, संच बसविल्याचे वर्ष व सूक्ष्म संच उत्पादक कंपनी". सदर चा मजकुर वितरकाकडून संच हस्तांतरीत करण्या पुर्वी कोरुन टाकण्यात यावा.
त्याच क्षेत्रावर ७ वर्षानंतर पुन्हा अनुदानाचा लाभ घेता येईल. पोर्टेबल स्प्रिंकलर चा लाभ घेतला असल्यास त्याच क्षेत्रावर ३ वर्षानंतर ठिबक सिंचन चा लाभ घेता येईल.
अधिक माहिती करिता-
मार्गदर्शक सूचना दिनांक २८-१०-२०२५