कांदा चाळ (एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत)
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत कांदाचाळ
सर्वसाधारणपणे कांदा जमिनीवर पसरवून ठेवून किंवा स्तानिकरीत्या तयार केलेल्या चाळीमध्ये कांदयाची साठवणूक करतात. त्यामुळे कांदा सोडून मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. तसेच कांद्याची प्रत व टिकाऊपणा यावर विपरीत परिणाम होतो. शास्त्रशुद्द कांदाचाळ उभारणीमुळे कांद्याची योग्य गुणवत्ता राखली जाऊन शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळते.
१. अर्ज कुठे करावा-
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा.
प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य या तत्वाद्वारे निवड होणार. त्याबाबतचा एसएमएस मोबाईलवर प्राप्त होणार.
२. अनुदान किती व कोणत्या कांदा चाळीना मिळणार -
५ ते १००० मे.टन क्षमतेच्या कांदा चाळी साठी खर्चाच्या ५० टक्के अनुदान मिळणार.
प्रकल्प खर्च ३० लाख पेक्षा जास्त असल्यास बँक कर्ज अनिवार्य.
अनुदान लाभार्थीच्या थेट बँक खात्यात जमा होणार.
३. लाभार्थी निवडीचे निकष -
अ . शेतकऱ्याने योजने अंतर्गत अर्ज करतांना त्यांच्या स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे. ७/१२ वर कांदा पिकाची नोंद असणे आवश्यक आहे.
ब . शेतकऱ्याकडे कांदा पीक असणे बंधनकारक आहे.
क . सादर योजनेचा लाभ वैयक्तिक कांदा उत्पादक शेतकरी, शेतकऱ्यांचा गट, स्वयंसहायता गट, शेतकरी महिला गट, शेतकऱ्यांचे उत्पादक संघ, नोंदणीकृत शेतीसंबंधी संस्था, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था, सहकारी पणन संघ यांना घेता येईल.
४ . आवश्यक असणारे कागदपत्रे
अ . ७/१२
ब. ८ अ
क. आधार कार्डाची छायांकित प्रत
ड. आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत
इ. जातीचा प्रमाणपत्र (अनु.जाती/ अनुजमाती शेतकऱ्यांसाठी)
ई. हमीपत्र (प्रपत्र-२)
फ. बंधपत्र (प्रपत्र-३)
५ . पूर्वसंमतीनंतर काम सुरु-
निवड झाल्यानंतर लाभार्थी यांनी १५ दिवसात कागदपत्रे अपलोड करावीत.तालुका कृषी अधिकारी यांचेकडून पूर्व संमती मिळाल्यानंतर काम कांदाचाळ उभारणीचे काम सुरु करावे. पूर्वसंमती दिल्यापासून १५ दिवसाच्या आत काम सुरु करणे आवश्यक तसेच पूर्वसंमती मिळाल्यापासून तीन महिन्याच्या आत कांदाचाळ उभारणे आवश्यक आहे .
कांदा चाळ किमान ७ वर्ष कार्यान्वित ठेवणे बंधनकारक .
अधिक माहितीसाठी