Total Pageviews

स्थायी/फिरते विक्री केंद्र-शीत चेंबर च्या सुविधेसह (राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत)

राष्ट्रिय फलोत्पादन अभियान अंतर्गत-
स्थायी/फिरते विक्री केंद्र-शीत चेंबर च्या सुविधेसह (Static/Mobile Vending Cart/Platform with cool chamber)

ऊद्देश-
ग्राहकांच्या सुविधेसाठी लोकवस्तीमध्ये/लोक वस्ती जवळ कमी खर्चाचे स्थायी/फिरते भाजीपाला विक्री हातगाडी/केंद्र स्थापन करुन योग्य दारामध्ये आणि आवश्यक त्या वेळेस ग्राहकांना फळे व भाजीपाला पूरवणे हा या योजने चा उद्देश आहे.
या योजने मध्ये कूल चेंबर च्या सुविधे सह हातगाडी, विक्री कट्टा, वजन काटे इ .भांडवली खर्च अनुदानासाठी ग्राह्य धरला जाइल.

माप दंड- 
अधिकतम ग्राह्य प्रकल्प खर्च- रु 30000/-.

अर्थ सहाय्याचे स्वरुप-
कूल चेंबर च्या सुविधे सह स्थायी/फिरते विक्री केंद्र स्थापन करण्यासाठी येणारे खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल रु.15000/- इतके अनुदान देय आहे.

पात्र लाभार्थी-
वैयक्तीक लाभार्थी, स्वयं सहाय्य महिला/पुरुष बचत गट, उत्पादकांच्या सहकारी संस्था, फलोत्पादं संघ, स्वयं सहायता गट -ज्यामध्ये किमान 25 सदस्य असतील, शेतकरी महिला गट तसेच सार्वजनिक क्षेत्रातील नोंदणी कृत कंपन्या इ .

अर्ज कुठे करावा-
तालुका कृषी अधिकारी कार्यालय

No comments:

Post a comment