Total Pageviews

बंदिस्त शेळी पालन (पोकरा अंतर्गत)

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत- बंदिस्त शेळीपालन- 

अ) योजनेत कोण सहभागी होऊ शकतात
ग्राम कृषी संजीवनी समितीने मान्यता दिलेले भूमीहीन कुटुंबातील व्यक्ती, विधवा, परित्यक्ता महिला, घटस्फ़ोटीत महिला, अनुसूचित जाती/जमाती मधिल महिला शेतकरी.                                                
ब) अर्थसहाय्य किती मिळते- 
खर्चाच्या 75 टक्के.  एका कुटुंबातील एकाच व्यक्तिस या योजनेचा लाभ देण्यात येइल. देय अनुदान थेट लाभार्थ्याच्या   आधार संलग्न बँक खात्यात  जमा करण्यात येते.                                   
क) किती शेळ्या खरेदी कराव्या लागतात- 
जास्तीत जास्त 10 शेळ्या व एक बोकड खरेदी साठी अनुदान देय आहे.   
उस्मानाबादी/संगमनेरी 10शेळ्या व एक बोकड खरेदी करण्यासाठी विमासह रु.70000 इतका खर्च गृहित धरण्यात आलेला आहे. 
तसेच अन्य जातिच्या पैदासक्षम 10 शेळ्या व एक बोकड खरेदी साठी विमा सह रु.47000 इतका खर्च गृहित धरण्यात आलेला आहे. 
यापेक्षा कमी शेळ्या खरेदी केल्यास खरेदी केलेल्या शेळ्यांच्या प्रमाणात अनुदानाचा लाभ देय आहे.
लाभार्थ्याने  सदरचा व्यवसाय किमान 3 वर्ष करणे आवश्यक आहे.                                              
ड ) अर्ज कुठे करावा - 
इच्छुक शेतकऱ्यांनी  https//dbt.mahapocra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.                                 

इ) खरेदी कोठून करावी-  
लाभार्थी ने पुर्व संमती मिलाल्यापासून एक महिन्याच्या आत खरेदी समितीच्या उपस्थितीत बाजार समिती मधून शेळ्या खरेदी कराव्यात. वाहतुकीचा खर्च लाभार्थीने करावा.खरेदीसमिती चे अध्यक्ष  हे सरपंच असतात. उपसरपंच, ग्राम कृषी संजीवनी समिती सदस्यां पैकी 1 महिला सदस्य, कृषी मित्र/कृषी ताई, पशुधन विकास अधिकारी/पशुधन पर्यवेक्षक हे सदस्य असतात. तर कृषी सहाय्यक हे सचिव असतात.