शेततळे अस्तरीकरण (पोकरा अंतर्गत)
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प - शेततळे अस्तरीकरण (इनलेट आउटलेट विरहित शेततळे साठी)
अ. योजनेत कोण सहभागी होऊ शकतात -
(१) प्रकल्प गावातील अल्प/अत्यल्प भूधारक शेतकरी आणि भूमिहीन कुटुंबे यांना वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी ७५ टक्के अर्थसहाय्य देय आहे.
(२) २ ते ५ हेक्टर पर्यंत जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी ६५ टक्के अर्थसहाय्य देय आहे.
ब) अर्ज कुठे करावा -
इच्छुक शेतकऱ्यांनी https//dbt.mahapocra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
क) आवश्यक कागदपत्रे -
7/12 व 8 अ
ड) लाभार्थी पात्रता -
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प अंतर्गत खोदलेल्या तसेच यापूर्वी इतर योजनेमधून खोदलेल्या इनलेट आउटलेट विरहित शेततळ्यांच्या अस्तरीकरणासाठी अनुदान देय आहे.
इ ) मापदंड -
शेततळे अस्तरीकरणासाठी प्लास्टिक शीट ५०० मायक्रॉन रुपये ७७/- प्रति चौरस मीटर व शीट बसविण्यासाठी रुपये १८/- प्रति चौरस मीटर याप्रमाणे एकूण रुपये ९५/- प्रति चौरस मीटर असा खर्चाचा मापदंड आहे
आकारमान खर्च (रुपयांमध्ये)
१५x१५x३ मी ५६५५०. ६५
२०x१५x३ मी ६३१९५. ९०
२०x२०x३ मी ८२४३६ . २५
२५x२०x३ मी ९९३४१. ५०
२५x२५x३ मी ११७३९९. १०
३०x२५x३ मी १३५४५६. ७०
३०x३०x३ मी १५६१२६. ८०