फळबाग लागवड (पोकरा 2.0 अंतर्गत)
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प -
फळबाग लागवड
अ) लाभार्थी पात्रता-
शेतकरी यांचे स्वत:चे नावे ७/१२ असणे आवश्यक. वैयक्तिक शेतकरी यांनाच लाभ देय. संस्थात्मक लाभार्थींना नाही.
जर ७/१२ उतारावर लाभार्थी संयुक्त खातेदार असेल तर सर्व खातेदारांचे फळबाग लागवडी साठी संमती पत्र आवश्यक.
७/१२ उताऱ्यावर कुळाचे नाव असेल तर कुळाचे संमतीपत्र आवश्यक.
लाभार्थी यांच्या मालकीची किमान ०.१० हे व कमाल ५ हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे.
इतर योजनेतुन यापूर्वी लाभ घेतला असल्यास लाभ घेतलेले क्षेत्र ५ हेक्टर या कमाल मर्यादेतून वगळून उर्वरित क्षेत्रासाठी लाभ घेता येईल.
एकापेक्षा जास्त फळ पीकांची लागवड करता येईल.
ब) लागवडीसाठी पात्र फळपिके -
या योजनेत एकुण १६ प्रकारची फळपिकांची कलमे/रोपे समाविष्ट आहेत.
आंबा कलमे , काजू कलमे , पेरू कलमे , डाळिंब कलमे ,
लिंबू कलमे/रोपे संत्रा कलमे , मोसंबी कलमे , सीताफळ कलमे ,
आवळा कलमे , चिंच कलमे जांभूळ कलमे , कोकम कलमे ,
फणस कलमे , अंजीर कलमे , चिकू कलमे , नारळ रोपे .
क) अनुदान -
१०० टक्के अनुदान
अनुदान हे ३ वर्षाच्या कालावधीत मिळणार.
अनुदान लाभर्थीच्या आधार लिंक्ड बैंक खात्यात थेट जमा होणार.
फळझाडे पहिल्या वर्षी किमान ८० टक्के व् दुसऱ्या वर्षी किमान ९० टक्के जगविणे आवश्यक आहे.
फळबाग़ लागवड वर्षभरात केव्हाही करता येईल.
लागवडीपूर्वी माती परिक्षण करणे बंधनकारक आहे.
ड.अर्ज कुठे करावा -
इच्छुक शेतकऱ्यांनी https//dbt.mahapocra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
इ ) कलमे /रोपे खरेदी कोठून करावीत-
तालुका कृषि अधिकारी यांचेकडून पूर्व संमती प्राप्त झाल्यानंतर शेतकरी यांनी कलमे प्रथम प्राधान्याने शासकीय / कृषि विद्यापीठ रोपवाटिका यामधून खरेदी करावीत. किंवा शासन मान्यता प्राप्त नोंदणी कृत खाजगी रोपवाटिका यामधून कलमे/रोपे खरेदी करून लागवड करावी. नोंदणी कृत खाजगी रोपवाटिकाना राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ NHB यांचेकडून मानांकन असणे आवश्यक आहे.
पूर्वसंमती मिळाल्यानंतर फळबाग़ लागवडीची कार्यवाही १२० दिवसात पूर्ण करावी.
लाभ घेतलेल्या फळपीकांकरिता ठिबक सिंचन संच बसविणे अनिवार्य आहे.
ई ) लागवड अंतर व मिळणारे अनुदान प्रती हेक्टर-
.
अधिक माहिती करिता-
मार्गदर्शक सूचना दिनांक २८-१०-२०२५