Total Pageviews

मधूमक्षिका पालन (पोकरा अंतर्गत)

नानाजी देशमुख  कृषि संजीवनी प्रकल्प - मधुमक्षिका पालन-                                                       
अ. योजनेत कोण सहभागी होऊ शकतात -           
(१) प्रकल्प गावातील अल्प/अत्यल्प भूधारक शेतकरी आणि भूमिहीन कुटुंबे यांना वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी ७५ टक्के अर्थसहाय्य देय आहे.                                                               
(2) २ ते ५  हेक्टर पर्यंत जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांना  वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी ६५ टक्के अर्थसहाय्य देय आहे.                                          
ब ) खर्चाचा मापदंड-  या घटकांतर्गत जास्तित जास्त 50 मधुमक्षिका संच (रु.100000), 50 स्टैंडर्ड मधुमक्षिका पेटी(रु.100000) व मध काढणी यंत्र व फुड ग्रेड मध कंटेनर(रु.20000) असा एकुण 220000 रु.खर्चाचा माप दंड आहे.                       
क) अर्ज कुठे करावा - इच्छुक शेतकऱ्यांनी  https//dbt.mahapocra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.                                  
ड  ) खरेदी बाबत-  लाभार्थी ने पुर्व संमती मिलाल्यापासून एक महिन्याच्या आत मधुमक्षिका व इतर बाबीं ची खरेदी, खरेदी समितीच्या उपस्थितीत करावी. खरेदीसमिती चे अध्यक्ष  हे सरपंच असतात. उपसरपंच, ग्राम कृषी संजीवनी समिती सदस्यां पैकी 1 महिला सदस्य, कृषी मित्र/कृषी ताई  हे सदस्य असतात. तर कृषी सहाय्यक हे सचिव असतात.     
इ) अनुदान मिळणे साठी-  लाभार्थीने  ऑनलाईन अनुदान मागणी उपविभागीय कृषी अधिकारी यांचे कडे करावी. सोबत खरेदी देयकां च्या मुळ प्रती व खरेदी समितीचे प्रमाणपत्र लाभार्थ्याने स्वस्वाक्षांकीत करुन ऑनलाईन अपलोड करावे. एका कुटूम्बातील एकाच व्यक्तिस या योजनेचा लाभ देण्यात येइल. मधुमक्षिका पालनासाठी प्रशिक्षण घेणे आवश्यक राहिल.लाभार्थ्याने सदरचा व्यवसाय हा किमान 3 वर्ष करणे आवश्यक आहे.