Total Pageviews

वनशेती (पोकरा अंतर्गत)

नानाजी देशमुख  कृषि संजीवनी प्रकल्प - वृक्ष लागवड 

अ. योजनेत कोण सहभागी होऊ शकतात - 

(१) प्रकल्प गावातील अल्प/अत्यल्प भूधारक शेतकरी आणि भूमिहीन कुटुंबे यांना वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी ७५ टक्के अर्थसहाय्य देय आहे.         
(२) २ ते ५  हेक्टर पर्यंत जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांना  वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी ६५ टक्के अर्थसहाय्य देय आहे.                               

ब) अर्ज कुठे करावा - 

इच्छुक शेतकऱ्यांनी  https//dbt.mahapocra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी. पूर्व संमती प्राप्त झाल्येनंतर उपविभागीय कृषि अधिकारी यांनी तांत्रिक मान्यता दिल्यावर शासकीय / नोंदणी कृत खाजगी रोपवाटिका यामधून कलमे/रोपे खरेदी करून लागवड करावी.                                    

क) आवश्यक कागदपत्रे - 
7/12 व 8 अ.           

ड ) मापदंड व अनुदान - 

प्रति झाड ७० रुपये हा माप दंड आहे.

या मापदंडाच्या ७५ टक्के मंजूर ५२. ५० रुपये प्रति झाड अल्प/अत्यल्प भूधारक शेतकरी आणि भूमिहीन कुटुंबे यांना चार वर्षात देण्यात येते.

तसेच २ ते ५  हेक्टर पर्यंत जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांना  ६५ टक्के म्हणजेच ४५. ५० रुपये अर्थसहाय्य चार वर्षात देण्यात येते.    

प्रथम वर्षी ४० टक्के, व्दितीय वर्षी २० टक्के, तृतीय वर्षी २० टक्के व चौथा वर्षी २० टक्के अनुदान देण्यात येते. 

दुसरे, तिसरे व चौथे वर्षी अनुक्रमे ९० टक्के, ७५ टक्के, ६५ टक्के झाडे जिवंत ठेवणे आवश्यक आहे.