हरितगृह व शेड नेट मध्ये भाजीपाला व फुले लागवड (पोकरा 2.0 अंतर्गत )
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा-२ -
हरितगृह व शेडनेट मध्ये लागवड साहित्य साठी अनुदान-
अ. योजनेत कोण सहभागी होऊ शकतात -
५ हेक्टर पर्यंत जमीन धारणा असलेले शेतकरी
सामयिक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांची संमती आवश्यक.
ब. क्षेत्र मर्यादा -
एका लाभार्थ्यास हरितगृह व शेडनेट मध्ये लागवड साहित्य साठी अनुदान कमीत कमी १००० चौ. मीटर व जास्तीत जास्त ४००० चौ. मीटर क्षेत्र मर्यादा पर्यंत लाभ घेता येईल.
यापूर्वी कोणत्याही शासकीय योजने अंतर्गत लाभ घेतला असल्यास सर्व योजना मिळून प्रति लाभार्थी जास्तीत जास्त ४००० चौ. मीटर क्षेत्र मर्यादा पर्यंतच लाभ अनुज्ञेय राहील.
यापूर्वी शासनाच्या योजनेतून लाभ घेतलेले क्षेत्र पुनश्च अनुदानासाठी पात्र राहणार नाही.
क. अनुदान किती मिळते -
आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के यापैकी जे कमी असेल ते अनुदान मिळते.
हरितगृह व शेडनेट हाउस मधील भाजीपाला लागवडीसाठी क्षेत्रानुसार खर्चाचे मापदंड व मिळणारे अनुदान -
वरील भाजीपाला पिकासाठी चे अनुदान हे प्रति चौमी. रोपांची किमान संख्या खालीलप्रमाणे शिफारशीनुसार असल्यानंतरच अनुदान देय राहील.
हरितगृहामधील फुलपिकांच्या लागवडीसाठी खर्चाचे मापदंड व मिळणारे अनुदान-
वरीलप्रमाणे फुलपिकांसाठी चे अनुदान हे प्रति चौमी. रोपांची किमान संख्या खालीलप्रमाणे शिफारशीनुसार असल्यानंतरच अनुदान देय राहील.
ड. कोणत्या बाबी अनुदानासाठी ग्राह्य आहेत-
हरितगृह आणि शेडनेटहाउस मध्ये भाजीपाला पिकांच्या लागवडी साठी लागवड साहित्य (रोपे ) व प्लास्टिक आच्छादन या बाबी अनुदानासाठी पात्र आहेत.
हरितगृहातील फुलपिकांच्या लागवडीसाठी फक्त लागवड साहित्य (रोपे) या बाबीसाठी अनुदान देय आहे.
लाभार्थ्यास हरितगृह/शेडनेटहाउस मध्ये भाजीपाला लागवड अथवा हरितगृहातील फुलपिके लागवड या दोन्हीपैकी एकाच घटकाचा लाभ घेता येईल.
भाजीपाला रोपांची खरेदी खात्रीशीर स्रोताकडून करावी.
फुलपिकांची खरेदी रॉयल्टी भरलेल्या रोपवाटीका धारकांकडूनच करावी.
लागवड साहित्याचा लाभ सुरुवातीला लागवड केलेल्या पिकासाठी एकदाच देय राहील.
उपविभागीय कृषि अधिकारी यांचेकडून पूर्वसंमती मिळाल्यापासून ६० दिवसाच्या आत लागवड करून डीबीटी पोर्टलवर मूळ देयक अपलोड करून ऑनलाइन अनुदान मागणी करावी.
हरितगृह व शेडनेट हाउस मध्ये कोणता भाजीपाला लागवड करता येईल-
हरितगृह व शेडनेट हाउस मध्ये- सिमला मिरची , टोमॅटो , ब्रोकोली,काकड़ी ,चेरी टोमॅटो ,रेड कैबेज ,लेट्यूस,खरबूज व
मिरची
हरितगृहामध्ये कोणती फुले लागवड करता येईल-
हरितगृहामध्ये एंथुरियम (कोको शेलमध्ये), ऑर्किड (कोको शेलमध्ये), कार्नेशन व जरबेरा ही फुलपिके लागवड करता येईल.
इ अर्ज कुठे करावा -
इच्छुक शेतकऱ्यांनी https//dbt.mahapocra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
ई. अधिक माहिती करिता-
मार्गदर्शक सूचना दिनांक २८-१०-२०२५