Total Pageviews

पक्षीरोधक / गारपीट रोधक जाळी

राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत-
पक्षीरोधक जाळी /गारपिटरोधक जाळी-

पक्षिरोधक जाळीचा उपयोग भाजीपाला व फळपीकांचे पक्षां पासून संरक्षण करण्याकरिता होतो. तसेच गारपीट रोधक जाळी मुळे भाजीपाला व फळपीकांचे गार पीटी पासून संरक्षण करता येते.

अर्थसहाय्य-
जाळी व इतर घटकांचा खर्च रु.35/-प्रती चौ.मी.इतका अपेक्षित धरलेला असुन या खर्चाच्या 50 टक्के अनुदान शेतकरी यांना मिळते.
प्रती लाभार्थी 5000 चौ.मी.पर्यंत लाभ देय आहे.

लाभ कोण घेऊ शकतात-
वैयक्तीक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी समूह, बचत गट, सहकारी संस्था.
इतर योजनेतून यापूर्वी अनुदान घेतलेले नसावे.

पक्षिरोधक जाळीचे प्रकार-
1) इकोनोमी अँटी बर्ड नेट(मेश साईज-15x 15मिमी).
2) हेवी ड्युटी अँटी बर्ड नेट(मेश साईज-12x 12मिमी).

अर्ज कुठे करावा- 
https://hornet.gov.in  या वेब साईट वर ऑनलाईन अर्ज करावा. व ऑनलाईन अर्जाची प्रिंट काढुन 7/12 व 8अ सह तालुका कृषी अधिकारी कार्यलयात सादर करावे.

अधिक माहिती साठी मार्गदर्शक सूचना