Total Pageviews

हळद रोपवाटीका स्थापन करणे (राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत)

राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत हळद रोपवाटिका स्थापना करणे 


    हळद रोपवाटिका स्थापना  या योजनेमध्ये शेतकऱ्यांनी / लाभार्थ्यांनी देशातील विविध कृषि विद्यापीठे, आसीएआर संस्था, राष्ट्रीय संशोधन केंद्रे, कृषि विज्ञान केंद्र, प्रादेशिक कृषि संशोधन केंद्रे, कृषि महाविद्यालये, राज्य शासन कृषी विभाग, शासकीय रोपवाटिका ( मानांकित)  इत्यादी खात्रीशीर स्रोतांकडून हळद बियाणे उपलब्ध करून घेउन (स्त्रोत अधिकृत असणे आवश्यक) त्याची लागवड करावी, व त्याचे उत्पादन करून इतर शेतकऱ्यांना वाटप करण्यात यावे. सुधारित हळद वाणाची रोपवाटिका स्थापन करून शेतकऱ्यांना हळद बियाणे वाटप करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. 


१. सदर योजनेचा  लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी हॉर्टनेट (http://www.hortnet.gov.in)  या ऑनलाईन संकेतस्थळावर नोंदणी करावी. 


२. लाभार्थी पात्रता - 

अ. योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांसाठी आहे. 

ब. शेतकऱ्यांकडे हळद रोपवाटिका करीत पुरेशा सिंचनाची सोय उपलब्ध असणे. 

क. एका लाभार्थ्यास किमान लागवडीचे क्षेत्र ०.५०  हेक्टर राहील. 

ड. एका लाभधारकास कमाल १ हेक्टर क्षेत्रापर्यंत अर्थसाहाय्य देता येईल. 

इ. यापूर्वी लाभ दिलेल्या लाभार्थ्यास अनुदान देय  नाही. 

ई. हळदीचे व्यापारी उत्पादन घेणाऱ्याला अनुदान न देता फक्त लागवडीचे कंद निर्माण करणाऱ्या  

  रोपवाटिका क्षेत्रासाठीच लाभ देय आहे.

उ. अनु.जाती/ अनु जमाती/महिला शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य. 


३. ऑनलाईन  नोंदणी करतांना आवश्यक असणारे कागदपत्रे 

.   ७/१२

.-  ८ अ 

.   आधार कार्डाची छायांकित प्रत 

.   आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत

.   जातीचा प्रमाणपत्र (अनु.जाती/ अनुजमाती शेतकऱ्यांसाठी)

.   पासपोर्ट फोटो


४ . शेतकऱ्यांनी  हॉर्टनेट प्रणालीवर अर्ज नोंदणी केल्यानंतर  तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे वरिल कागद पत्रांसह अर्ज सादर करावा 

  

५ . अर्थसहाय्य 

    हळद पिकाचा सरासरी लागवड खर्च रुपये ३००००/- प्रति हेक्टर इतका असून या खर्चाच्या ४० टक्के कमाल रुपये १२०००/- इतके अनुदान प्रति लाभार्थी देय  आहे. लाभार्थ्याने लागवड केलेल्या हळद पिकाची नोंद ७/१२ वर करावी त्यानंतरच अनुदानाचे वितरण PFMS प्रणालीद्वारे लाभार्थीचे आधार संलग्न बँक खात्यावर जमा करण्यात येईल. 

      



अधिक माहिती साठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.