Total Pageviews

पंप संच व पाईप (पोकरा अंतर्गत)

नानाजी देशमुख  कृषि संजीवनी प्रकल्प - पाणी उपसा साधने (पंपसंच) व पाईप-

अ) अर्ज कुठे करावा - इच्छुक शेतकऱ्यांनी  https//dbt.mahapocra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी. 


ब) आवश्यक कागदपत्रे - 
7/12 व 8 अ


क) लाभार्थी पात्रता - 

१. ग्राम कृषि संजिवनी समितीने मान्यता दिलेले शेतकरी समूह. 

२. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनासाठी पाणी उपलब्ध आहे, परंतू  पाणी उपसा साधन नाही अश्या शेतकऱ्यांना लाभ देय. 

३. पाणी उपसा साधन असलेले तसेच या घटकाचा इतर कोणत्याही योजनेतून लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना लाभ देय  नाही. 

४. लाभार्थींना त्यांच्या पसंतीनुसार सेवा पुरवठादार संस्थांकडून पंप संच व पाईप खरेदी करण्याची मुभा राहील.

५. तांत्रिक निकषाप्रमाणे साहित्य खरेदी करणे बंधनकारक आहे.

६. उपविभागीय कृषि अधिकारी यांनी ऑनलाईन पूर्व संमती दिल्यानंतर पंप संच व पाईप खरेदी करावे.

७. अनुदान मिळणेसाठी सेवा पुरवठादार संस्थेकडील देयके शेतकऱ्याने स्वतःचे स्वाक्षरी करून ऑनलाइन अपलोड करणे आवश्यक आहे.


ड) अर्थसहाय्य - 

१. पंप संचकरीता (विद्युत पंप व डिझेल इंजिन ५ एच पी पर्यंत)

(१) प्रकल्प गावातील अल्प/अत्यल्प भूधारक शेतकरी यांना ७५ टक्के, कमाल रुपये १५०००/- अर्थसहाय्य देय आहे.  

(२) २ ते ५  हेक्टर पर्यंत जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांना  ६५ टक्के, कमाल  रुपये १३०००/- अर्थसहाय्य देय आहे.


२. पाईप करिता (अनुदान - HDPE - रु.५०/मी. PVC - रु.35/मी. HDPE laminated - रु.20/मी.)

१) प्रकल्प गावातील अल्प/अत्यल्प भूधारक शेतकरी यांना ७५ टक्के, कमाल रुपये २२५००/- अर्थसहाय्य देय आहे.  

(२) २ ते ५  हेक्टर पर्यंत जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांना  ६५ टक्के, कमाल  रुपये १९५००/- अर्थसहाय्य देय आहे.