शेडनेट हाऊस (राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत)
राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत शेडनेट हाऊस उभारणी करणे
१. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी हॉर्टनेट (http://www.hortnet.gov.in) या ऑनलाईन संकेतस्थळावर नोंदणी करावी.
२. ऑनलाईन नोंदणी करतांना आवश्यक असणारे कागदपत्रे
. ७/१२
.- ८ अ
. आधार कार्डाची छायांकित प्रत
. आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत
. जातीचा प्रमाणपत्र (अनु.जाती/ अनुजमाती शेतकऱ्यांसाठी)
. पासपोर्ट फोटो
३ . शेतकऱ्यांनी हॉर्टनेट प्रणालीवर अर्ज नोंदणी केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे वरिल कागद पत्रांसह अर्ज सादर करावा
४ . शेडनेटचे प्रकार (आकारमान ) फ्लॅट टाईप उंची ४ मीटर अनुदान मर्यादा (प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के)
(१००० चौ. मी आकारमानासाठी ३१२५२० रुपये).,
(२००० चौ. मी आकारमानासाठी ५३६५७६ रुपये).,
(३००० चौ. मी आकारमानासाठी ७४६३२० रुपये).,
(४००० चौ. मी आकारमानासाठी ९४०००० रुपये).,
अधिक माहिती साठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी सम्पर्क साधावा.