Total Pageviews

पैक हाऊस

राष्ट्रिय फलोत्पादन अभियान अंतर्गत पैक हाऊस-
ऊद्देश-
1. उत्पादित फलोत्पादन, औषधी सुगंधी मालाची शेतावरच साफसफाई, प्रतवारी व आवश्यक वजनाचे पेकिंग करुन तात्पुरती साठवणूक करणे.
2. फळे फुले भाजिपाला, औषधी व सुगंधी वनस्पती यासारख्या नाशवंत मालाचे आयुष्य व दर्जा वाढविणे.
3.कच्च्या मालावर प्राथमिक प्रक्रिया करुन उत्पादनाचे मुळ रुपात बदल न करता गुणात्मक वाढ करणे.
4. मध्यस्थांची संख्या कमी करुन प्रत्यक्ष उत्पादकाला वाजवी भाव मिळवून देणे व ग्राहकांना योग्य दरात माल उपलब्ध करुन देणे.
1.1 फळ्पीके/औषधी व सुगंधी वनस्पती/भाजीपाला पिके:-
            फळ्पीके, भाजीपाला, औषधी व सुगंधी वनस्पती यांच्या आवश्यकतेप्रमाणे किमान 30-50 मे.टन प्रतिवर्ष या क्षमतेच्या पैक हाऊस ची उभारणी करणे अपेक्षीत असून यामध्ये फळपीकांच्या व वनस्पतींच्या मुळ रुपात बदल न करता काढणी पश्चात प्रक्रिया पैकिंग, सिलिंग यासाठी आवश्यक असणारी यंत्र सामुग्री,कच्चा माल तयार मालासाठी साठवणूक सुविधा, हाताळणी साठी आवश्यक यंत्रना(ट्रॉली, प्लास्टिक क्रेटस,लिफ्टर्स), काढणी पश्चात व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना, शुन्य उर्जाधारीत शीतकक्ष, पाण्याची सुविधा, टाकाऊ पदार्थांचा निचरा अथवा पुनर्वापर करणारी यंत्रना या बाबींचा समावेश राहिल.
1.2 फुल पिके:-
               फुलांसाठी उभारावयाच्या पैक हाऊस साठी येणारे खर्चात कटफ्लावर्स व कंदवर्गिय फुलां साठी प्रती वर्ष 2 लक्ष फुल दांडे किंवा सुट्या फुलां साठी 20'30 टन फुले प्रती वर्ष या क्षमतेचे पैक हाऊस उभारणे अपेक्षीत आहे. यामध्ये फुलांची आवश्यकते प्रमाणे स्वच्छता, प्रतवारी, काढणी पश्चात प्रक्रिया, पैकिंग, सिलिंग यासाठी आवश्यक यंत्रना(ट्रॉली, प्लास्टिक क्रेटस,लिफ्टर्स), काढणी पश्चात व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना, शुन्य उर्जाधारीत शीतकक्ष, टाकाऊ पदार्थांचा निचरा अथवा पुनर्वापर करणारी यंत्रना या बाबींचा समावेश राहिल.
1.3 अर्थसहाय्य्य-ग्राह्य भांडवली खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल रु. 2 लाख.
1.4 अपेक्षीत खर्च - एकुण 600 चौ.फुट (9x6 मी) क्षेत्रफळाच्या बांधकामासाठी रु.3 लाख व इतर सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी (प्लास्टिक क्रेटस, वजन काटे, ट्रॉली, घमेले, कटर , सिलिंग मशीन, प्रतवारी व पैकिंग साठी आवश्यक फर्नीचर इ .) रु.1 लाख भांडवली खर्च ग्राह्य धरण्यात येइल.