Total Pageviews

विहिर पुनर्भरण (पोकरा अंतर्गत)

नानाजी देशमुख  कृषि संजीवनी प्रकल्प - भूजल पुनर्भरण (विहिरीचे)-

अ) अर्ज कुठे करावा - 
इच्छुक शेतकऱ्यांनी  https//dbt.mahapocra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी. 


ब) आवश्यक कागदपत्रे - 
7/12 व 8 अ


क) लाभार्थी पात्रता - 

१. ग्राम कृषि संजिवनी समितीने मान्यता दिलेले शेतकरी . 

२. ज्या विहिरी बंद पडलेल्या आहेत तसेच ज्यांची पाण्याची पातळी खोल गेलेली आहे, असे शेतकरी यांना प्राधान्याने लाभ देण्यात येइल.

३. या घटकाचा इतर कोणत्याही योजनेतून लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना लाभ देय  नाही. 

४. उपविभागीय कृषी अधिकारी यांनी ऑनलाईन पुर्व संमती दिल्यानंतर लाभार्थींना त्यांच्या पसंतीनुसार अनुभवी व्यक्ती/संस्थे कडून सदर काम करण्याची मुभा आहे.

५. तांत्रिक निकषाप्रमाणे साहित्य खरेदी करणे बंधनकारक आहे.

७. अनुदान मिळणेसाठी  देयके शेतकऱ्याने स्वतःचे स्वाक्षरी करून ऑनलाइन अपलोड करणे आवश्यक   आहे.

8. ज्या विहिरी मधिल ऑक्टोबर महीन्यातील पाण्याची पातळी सरासरी 4 मिटर पेक्षा खाली असेल अश्याच ठीकाणी ही योजना राबविण्यात येते जेणेकरुन पावसाळ्यात विहिरिं मध्ये पाणी मुरविता येणे शक्य होइल.

ड) अर्थसहाय्य-  
यामध्ये प्रामुख्याने साठवण खडडा , शोष खड्डा, साठवण खड्ड्याकरिता इनलेट , साठवण खड्डा ते शोष खड्डा नाली, शोष खड्ड्या करिता आऊट्लेट ही कामे करावी लागतात. यासाठी खालील प्रमाणे अनुदान देण्यात येते.
 (1) भारी जमीन पक्की विहिर  रु. 11397/- अनुदान 
 2) हलकी जमीन व पक्की विहिर- रु.11797,/-.अनुदान  
3) भारी जमीन व कच्ची विहिर- रु.12846/-अनुदान 
4) हलकी जमीन व कच्ची विहिर- रु.13246/-  अनुदान

अधिक माहितीसाठी मार्गदर्शक सूचना