Total Pageviews

मधूमक्षिका पालन (राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत)

राष्ट्रिय फलोत्पादन अभियान अंतर्गत-

*मधुमक्षिका पालन*
मधमाशा फुलातील मध गोळा करताना अप्रत्यक्षपणे परागी करणाचे मोठे कार्य करतात. यामुळे उत्पादनात वाढ होते. तसेच मधमाशां पासून मध, मेण यासारखी उत्पादने देखील मिळतात. त्यामुळे मधुमक्षिका पालनाद्वारे दुहेरी फायदा मिळतो.
राज्यात खादी ग्रामोद्योग विकास महामंडळ ,केंद्रीय मधुमक्षिका पालन आणि प्रशिक्षण केंद्र संस्था कार्यरत आहेत. त्यांचे कडून तांत्रिक मार्गदर्शन व प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाते.
राष्ट्रिय फलोत्पादन अभियान अंतर्गत खालील बाबीं साठी अनुदान मिळते.

1) बी ब्रीडर कडून मधुमक्षिका वसाहतीचे उत्पादन करणे साठी अनुदान-
मधुमक्षीका वसाहती चे उत्पादन करण्यासाठी बी ब्रीडर ला (सार्वजनिक/खाजगी/सहकारी संस्था/व्यक्ती/महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ) शासनाने निर्धारित केलेले प्राधिकारी (एस डी ए) यांचे कडे नोंदणी करणे आवश्यक आहे.
बी ब्रीडर कडे कमीत कमी 150 रिकामे बी बॉक्सेस,  50 न्युक्लियस बॉ क्से स व 500 ब्रूड फ्रेम्स असणे आवश्यक आहे.
न्युक्लियस स्टॉक उत्पादक या व्यावसायिक बी ब्रीडर्सना न्युक्लियस स्टॉक चे बी कॉलनी मध्ये रुपांतर करण्यासाठी, न्युक्लियस बी चा पुरवठा करतील.
या बी ब्रीड र्स ना त्यांचे कडील साधन सामुग्री वाढविण्यासाठी त्यांचेकडे आवश्यक अतिरिक्त सुविधा निर्माण करण्या करिता येणारे खर्चाच्या 40 टक्के, कमाल रु.4 लाख इतके अर्थ सहाय्य देय आहे.
बी ब्रीडर ला प्रती वर्षी कमितकमी 2000 वसाहतींची निर्मिती करणे बंधनकारक आहे.
याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करुन मंजुरीसाठी मंडळ कार्यालयास पाठवावा लागतो.

2) मधुमक्षिका वसाहत व मधू मक्षिका संच वाटप-

यासाठीचा मापदंड रु. 2000 प्रती मधुमक्षिका संच असा आहे.
या मापदंडाच्या 40 टक्के किंवा कमाल रु.800 प्रती मधू मक्षिका संच या प्रमाणे अनुदान देय आहे.
एका लाभार्थ्यास जास्तीत जास्त 50 मधू मक्षिका संचा साठी अनुदान देण्यात येते.
एका मधुमक्षिका संचा मध्ये 4 खणांच्या चौकटी सह, राणीमाशी सह मधमाशांच्या पोळ्या करिता सदरचे अनुदान देय आहे. याव्यतिरिक्त जास्तीचा खर्च जसे वाहतुक, पैकिंग, मजुरी, आकस्मिक खर्च इ.लाभार्थ्यास करावा लागेल.
स्टैंडर्ड मधुमक्षिका पेटी करिता खर्चाच्या 40 टक्के कमाल  रु.800 अनुदान देय आहे.
मधू मक्षिका वसाहतींसाठी एपिस मेलिफेरा व एपिस सिराना या जातींच्याच मधमाशांचा वापर करण्यात यावा.
देय अनुदान पीएफएमएस प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येते.

लाभार्थी पात्रता-
ज्या शेतकरी यांनी मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण घेतलेले आहे  असे शेतकरी यांना प्राधान्य.
महिला शेतकरी, महिला बचत गट, अनुसूचित जाती/जमाती शेतकरी गट, सुशिक्षीत बेरोजगार युवकांचे गट यांना प्राधान्य.
लाभार्थी कडे स्वत:ची जमीन असणे आवश्यक आणि त्यावर मोठ्या प्रमाणात मधुमक्षिका पालनास सहयोगी ठरणारे फलोद्यान पिकांची लागवड असणे गरजेचे आहे.
तसेच लाभार्थी कडे शेवगा, सुर्यफुल, घाणेरी, मोहरी इ. वनस्पतीं ची लागवड असावी जेणेकरुन मध माशांना नियमित व पुरेसा अन्न पुरवठा उपलब्ध होवू शकेल.
ज्यांचे कडे स्वत:ची जमीन नाही त्यांनी पे ट्या चा संच हस्तांतरीत स्वरुपात कोणत्या शेतकरी यांचे कडे ठेवणार त्याचा तपशील जोडणे आवश्यक आहे.
ज्या क्षेत्रात मधुमक्षिका पालन करावयाचे आहे त्या परिसरात पिक उत्पादन पद्धतीत एकात्मिक किड व्यवस्थापन, सेंद्रीय शेती  प्रामुख्याने केली जाणे आवश्यक आहे. किमान अश्या क्षेत्रात रासायनिक कीटक नाशकांचा वापर नसणे अथवा अत्यंत माफक व मधुमक्षिका पालनास हानिकारक ठरणार नाही अशाच कीटक नाशकांचा वापर करणे गरजेचे आहे.
मधुमक्षिका पालनाची निविष्ठा/ संच शासनाने विहित केलेल्या स्त्रोता कडून घेणे बंधनकारक आहे.

3) मध काढणी यंत्र (Honey extractor) व मध साठवणे करिता भांडे (food grade container)-
 यासाठी रु.20000 इतका खर्चाचा मापदंड आहे.
खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल रु. 8000 इतके अनुदान लाभार्थी यांना देण्यात येते.
या बाबीचा लाभ मध उत्पादक शेतकरी, महिला शेतकरी, महिला बचत गट, अनुसूचित जाती/जमाती शेतकरी गट, सुशिक्षीत बेरोजगार युवकांचे मध उत्पादक गट यांना देय आहे.