Total Pageviews

जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन (राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत)

राष्ट्रीय फलोत्पादन  अभियान अंतर्गत 
जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करून उत्पादकतेत वाढ करणे


    योग्य मशागत पद्धतीचा अवलंब न करणे, नांग्या न भरणे, खते व औषधाचा वापर न करणे, झाडांना व्यवस्थित आकार न देणे इत्यादी बाबीमुळे फळबागांची उत्पादकता कमी होते. 

१. सदर योजनेचा  लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी हॉर्टनेट (http://www.hortnet.gov.in)  या ऑनलाईन संकेतस्थळावर नोंदणी करावी. 


२. ऑनलाईन  नोंदणी करतांना आवश्यक असणारे कागदपत्रे 

अ . ७/१२

ब.   ८ अ 

क.  आधार कार्डाची छायांकित प्रत 

ड. आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत

इ. जातीचा प्रमाणपत्र (अनु.जाती/ अनुजमाती शेतकऱ्यांसाठी)

ई. यापूर्वी कोणत्याही योजनेतून लाभ घेतला नसल्याबाबतचे हमीपत्र

ई. पासपोर्ट फोटो


३. अर्थसहाय्य -  
या घटकांतर्गत जुन्या फळबागांच्या पुनरुज्जीवनसाठी येणाऱ्या खर्चाच्या ५० टक्के व जास्तीत-जास्त रु. २००००/- प्रति हेक्टर या प्रमाणे अर्थ साहाय्य देय आहे.  


४. क्षेत्र मर्यादा - 
कमीत-कमी ०.२० हेक्टर व कमाल २.०० हेक्टर क्षेत्रासाठी अनुदान देय आहे. सर्वसाधारणपणे ज्या बागेतील ५० झाडांची उत्पादकता कमी झालेली असेल त्याच बागांना या घटकाचा लाभ देण्यात येईल. 


५. पुनरुज्जीवन कार्यक्रमासाठी फळपिकनिहाय किमान व कमाल वय 

फळपिकांचे नाव     कमीत-कमी वय     जास्तीत-जास्त वय 

आंबा         २०        ५०

संत्रा         १०        २५


६. पुनरुज्जीवन मध्ये करावयाची कामे 

अ. आंबा - पिकामधील बांडगुळे (परोपजीवी वनस्पती) काढून टाकणे, बागेंची/झाडांची स्वच्छता करणे, गावठी झाडांचे सुधारित झाडांमध्ये रूपांतर करणे, मेलेली झाडे व रोग/किडग्रस्त झाडे काढून नवीन झाडे लावणे, झाडांच्या वाळलेल्या फांद्या काढून टाकणे,  जुन्या कमी उत्पादित झाडांची छाटणी करणे व नांग्या भरणे, वळण देणे इत्यादी महत्वाची कामे आहेत. शिफारसीनुसार एकात्मिक खात व्यवस्थापन करणे, नत्र, स्फुरद,पालाश,सूक्ष्म मुलं द्रवे, संजीवके, रोग व किडींचे एकात्मिक पिक संरक्षण व व्यवस्थापन करणे. 


ब. संत्रा - फळझाडांची छाटणी करणे, वळण देणे, मध्यम व वाळलेल्या फांद्या कापून काढणे, शेंड्याकडून वळत झाडाच्या हिरव्या फांद्या ३० ते ४५ से. मी. शेंड्यापासून कापणे, डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव असल्यास तो भाग साफ करून त्यावर बोर्डो पेस्ट (१-१-१०) लावणे, सेंद्रिय बायो डायनॅमिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, झाडांचे टॉप वर्किंग करणे व नांग्या भरणे, शिफारसीनुसार रासायनिक व शेणखत देणे, कीटक व बुरशीनाशकाची फवारणी करणे, आळे पद्धतीने पाण्याचे व्यवस्थापन करणे, रस शोषन करण्याऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी शीफारशींप्रमाणे कीटकनाशके व प्रकाश साफळे यांचा वापर करावा. 


६ . शेतकऱ्यांनी  हॉर्टनेट प्रणालीवर अर्ज नोंदणी केल्यानंतर  तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे वरिल कागद पत्रांसह अर्ज सादर करावा, तालुका कृषी अधिकारी यांचेकडून पूर्व संमती मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही करावी.  देय अनुदान जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी स्तरावरून PFMS प्रणालीद्वारे थेट लाभार्थींच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्यात येईल. 

अधिक माहितीसाठी मार्गदर्शक सूचना


अधिक माहिती साठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.