Total Pageviews

हरीतगृह (पोकरा अंतर्गत)

नानाजी देशमुख  कृषि संजीवनी प्रकल्प - हरितगृह 

हरितगृहाचा उपयोग प्रामुख्याने हंगामी व बिगर हंगामी पिके घेण्यासाठी, उच्च प्रतीच्या फुलांच्या उत्पादनासाठी व उती  संवर्धनाद्वारे तयार केलेल्या रोपांची वाढ करणे व रोपवाटिका तयार करणेसाठी करण्यात येतो.      
                              
अ. योजनेत कोण सहभागी होऊ शकतात -        
  
(१) प्रकल्प गावातील अल्प/अत्यल्प भूधारक शेतकरी आणि भूमिहीन कुटुंबे यांना वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी ७५ टक्के अर्थसहाय्य देय आहे.                                                             
(२) २ ते ५  हेक्टर पर्यंत जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांना  वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी ६५ टक्के अर्थसहाय्य देय आहे.                               

ब ) आवश्यक कागदपत्रे - 
7/12 व 8 अ              

क) क्षेत्र मर्यादा  -
एका लाभार्थ्यास हरितगृहासाठी कमीत कमी ५०० चौ. मीटर व जास्तीत जास्त ४००० चौ. मीटर क्षेत्र मर्यादा पर्यंत लाभ घेता येईल. यापूर्वी कोणताही शासकीय योजने अंतर्गत लाभ घेतला असल्यास सर्व योजना मिळून प्रति लाभार्थी जास्तीत जास्त ४००० चौ. मीटर क्षेत्र मर्यादा पर्यंतच लाभ अनुज्ञेय  राहील. या बाबीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना या बाबीचे तांत्रिक प्रक्षिशण अनुदान अदायगी पूर्वी घेणे बंधनकारक राहील. सदर प्रशिक्षणाची सोय राष्ट्रीय काढणी पश्चात तंत्रज्ञान प्रशीक्षण संस्था, तळेगाव दाभाडे, तालुका वडगाव मावळ, जिल्हा पुणे येथे आहे. सादर प्रशिक्षणासाठी आवश्यक शुल्काची पूर्ण रक्कम नानाजी देशमुख  कृषि संजीवनी प्रकल्प मार्फत अदा करणेत येईल. 

ड ) अर्ज कुठे करावा - 
इच्छुक शेतकऱ्यांनी  https//dbt.mahapocra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी. 
                              
ई ) खर्चाचे मापदंड- 
५६० चौ मीटर करीता - रु. ५२३६००/-, १००८ चौ मीटर करिता रु. ९४२४८०/-, २०१६ चौ. मीटर करिता - १७९४२४०/-, ३१२० चौ. मीटर करिता - रु. २६३३२८०/-, तसेच ४००० चौ मीटर करिता - रु. ३३७६०००/-