फलोत्पादन यांत्रिकीकरण (राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत)
राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत यांत्रिकीकरण
१. अर्ज कुठे करावा-
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी (http://www.mahadbt.maharashtra.gov.in) या ऑनलाईन संकेतस्थळावर नोंदणी करावी.
२. ऑनलाईन नोंदणी करतांना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत-
अ. विहित नमुन्यातील अर्ज
ब. ७/१२ चा उतारा (फलोत्पादनाच्या नोंदीसह)
क. आधार कार्डाची छायांकित प्रत
ड. आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत
इ. जातीचा प्रमाणपत्र (अनु.जाती/ अनुजमाती शेतकऱ्यांसाठी)
ई. हमीपत्र
३. यांत्रिकीकरण अंतर्गत कोणत्या प्रकारच्या अवजारांना अनुदान देण्यात येते-
या अंतर्गत ट्रॅक्टर, पॉवर टिलर, मॅन्युअल स्प्रेअर-नॅपसॅक/फूट स्प्रेअर, पॉवर नॅपसॅक स्प्रेअर, पॉवर संचलीत तैवान स्प्रेअर, ट्रॅक्टर चलित स्प्रेअर, इको-फ्रेंडली लाईट ट्रॅप ही संयंत्रे समाविष्ट आहेत.
४. लाभार्थी शेतकरी यांना अर्थसाह्य किती मिळते-
अज/अजा/अल्प/अत्यल्प/महिला करीता किमतीच्या ५० टक्के, आणि इतर लाभार्थी यांना किमतीच्या ४० टक्केअर्थसाह्य देण्यात येते.
५. शेतकऱ्यांनी अर्ज नोंदणी केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी यांचेकडून ऑनलाईन पूर्व संमती मिळाल्यानंतर अवजारे खरेदी करावीत. देय अनुदान जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी स्तरावरून PFMS प्रणालीद्वारे थेट लाभार्थींच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्यात येईल.
https://drive.google.com/open?id=1LYnO8Jkaz-Ly6vdaM8bWXWOmeu4771q0
अधिक माहिती साठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.