गोड्या पाण्यातील मत्स्य पालन (पोकरा 2.0 अंतर्गत)
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा-२-
गोड्या पाण्यातील मत्स्यपालन
अ) योजनेत कोण सहभागी होऊ शकतात -
१) ५ हेक्टर पर्यंत जमीन धारणा असलेले ज्या शेतकऱ्याकडे सामुदायिक किंवा वैयक्तिक शेततळे आहे.
२) इतर कोणत्याही योजनेतून लाभ घेतलेला नसावा.
३) पाण्याचा साठा किमान 8 ते 10 महिने असणे आवश्यक आहे.
४)शेतकरी यांचेकडे पाणी उपसा साधन(पंप संच)असणे बंधनकारक आहे.
५) लाभार्थ्याने लाभ मिळाल्यानंतर सदर व्यवसाय किमान ५ वर्ष करणे बंधनकारक आहे.
ब ) आवश्यक कागदपत्रे-
७/१२ व ८अ.
क ) अनुदान -
अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकरी आणि महिला यांचेसाठी आर्थिक मापदंडाच्या ६० टक्के अनुदान तर सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकरी यांचेसाठी ४० टक्के अनुदान आहे.
ड ) अर्ज कुठे करावा -
इच्छुक शेतकऱ्यांनी https//dbt.mahapocra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
इ ) मत्स्य बीज खरेदी बाबत-
लाभार्थी ने पुर्व संमती मिळाल्यानंतर ३० दिवसाच्या आत या घटकाची अंमलबजावणी करावी. मत्स्य बीज खरेदी लाभार्थ्याने मत्स्य व्यवसाय विभागाच्या शासकीय मत्स्य बीज केन्द्रा कडून करणे आवश्यक आहे. तेथे बीज शिल्लक नसल्यास इतर खाजगी मत्स्य बीज केन्द्रा कडून त्यांचे जबाबदारी वर खरेदी करावे. परंतू लाभार्थ्याला शासकीय दरानुसार मत्स्य बीज खरेदी साठी अनुदान देय राहिल.
फ) अनुदान मिळणे साठी-
लाभार्थीने ऑनलाईन अनुदान मागणी उपविभागीय कृषी अधिकारी यांचे कडे करावी. सोबत मत्स्य बीज, खाद्य ,खते व आवश्यक साहित्य यांची स्वस्वाक्षांकीत केलेली मूळ खरेदी देयके अपलोड करावी .अनुदान थेट लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येइल. मत्स्य पालना बाबत लाभार्थी यांचे साठी प्रशिक्षण शासकीय खर्चाने देण्यात येइल.
कोणत्या प्रकारच्या शेततळ्यांमध्ये मत्स्य पालन साठी व किती अनुदान मिळते (आकारमान मीटर) -
१५ x १५ x ३ , २० x १५ x ३ , २० x २० x ३
२५ x २० x ३ २५ x २५ x ३ ३० x २५ x ३
३० x ३० x ३ २४ x २४ x ४ ३४ x ३४ x ४.७
शेततळ्याच्या आकरमाना नुसार किमान ६६०२ व कमाल ४५३०५ अनुदान मिळते.
शेततळ्याच्या आकरमानानुसार येणारा खर्च व मिळणारे अनुदान-
शेततळे अस्तरीकरणासह साठी लागणारे साहित्य-फेक जाळे , बर्ड नेट , बोटूकली,पूरक खाद्य
शेततळे अस्तरीकरणाशिवाय साठी लागणारे साहित्य-फेक जाळे , बर्ड नेट , बोटूकली,चुना, यूरिया, शेणखत,पूरक खाद्य
अधिक माहितीसाठी-