Total Pageviews

वातावरण नियंत्रीत रिटेल बाजार/ किरकोळ विक्री दालन (राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत)

वातावरण नियंत्रीत रिटेल बाजार / विक्री दालन (Environmentally controlled Retail Markets/Outlets)-

उद्देश-
वाढणारे शहरीकरण, शहरां मधिल व्यक्तींचे वाढते उत्पन्न, जीवन शैली इ .मुळे देशात रिटेल मार्केट ची वाढ होत आहे. अशा प्रकारच्या रिटेल मार्केट मधून फलोत्पादीत उत्पन्नाची सुविधा असलेली दालने सुरु करण्याच्या दृष्टीकोनातून तसेच स्वतंत्ररित्याही अशी दालने सुरु करण्याच्या दृष्टीकोनातून सदरील योजना राबविण्यात येत आहे.
सदर योजने अंतर्गत अनुदानासाठी भांडवली खर्च ग्राह्य धरला जाइल.उदा.बांधकाम, शीत साखळी सुविधा, ईलेक्ट्रॉनीक वजन काटे, प्लास्टीक क्रेटस, तापमान नियंत्रण यंत्रणेसह रैकस इ .

माप दंड- 

अधिकतम  ग्राह्य प्रकल्प खर्च- रु.15 लाख प्रती यूनिट.

अर्थसहाय्याचे स्वरुप- 

वातावरण नियंत्रीत रिटेल बाजार/ विक्री दालन उभारणी करण्यासाठी येणारे खर्चाच्या सर्व साधारण क्षेत्रा साठी  35 टक्के किंवा कमाल रु.5.25 लाख अर्थ साह्य देय आहे.

डोंगराळ व अधिसूचीत क्षेत्रा साठी खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल रु.7.50 लाख अर्थ साह्य देय आहे.

पात्र लाभार्थी-  

अ. वैयक्तीक लाभार्थी- 
वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी सदर अर्थ साह्य हे बँक कर्जाशी निगडित असून (credit linked back ended subsidy) बँक कर्जाच्या परताव्याच्या स्वरूपात देय  आहे.

ब. इतर लाभार्थी - 
शेतकरी समूह, शेतकरी संघ, राज्य सहकारी संस्था, सहकारी, नोंदणीकृत संस्था, विश्वस्त संस्था, फलोत्पादन संघ, स्वयंसहायता गट (ज्यामध्ये किमान २५ सदस्य असतील), शेतकरी महिला गट, या संस्था अनुदान वगळता प्रकल्पाचा इतर खर्च स्वतः उभारणार असल्यास त्यांना बँक कर्जाची अट  असणार नाही. मात्र त्यांना आर्थिकदृष्टया सक्षम असल्याचे लेखा परिक्षण केलेल्या  मागिल 3 वर्षाचे  पुरावे सादर करावे लागतील.

अर्ज कुठे करावा- 
तालुका कृषी अधिकारी कार्यालय