Total Pageviews

गांडूळ खत/नाडेप/सेन्द्रीय निविष्ठा उत्पादन यूनिट (पोकरा 2.0 अंतर्गत)

नानाजी देशमुख  कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा-२ - 
गांडूळ खत उत्पादन यूनिट आणि नाडेप कंपोस्ट उत्पादन यूनिट- 
  
शेतातून निघालेल्या सर्व वनस्पतीजन्य पदार्थापासून सेंद्रीय खत तयार करुन,परत शेतात टाकणे ही काळाची गरज आहे. सेंद्रिय  खतामुळे जमिनीचा कस व जलधारणा  शक्ती वाढुन पोषक द्रव्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात होतो.जमीन भुसभूशीत राहते. जमिनीत हवा खेळती राहते.शेतात उपयुक्त सूक्ष्म जिवाणुंची वाढ होते.                                         
अ) योजनेत कोण सहभागी होऊ शकतात -           

१) ५ हेक्टर पर्यंत जमीन धारणा असलेले  शेतकरी . 
२)  यूनिट उभारण्या करिता जागा उपलब्ध असावी. 
३) इतर कोणत्याही योजनेतून लाभ घेतलेला नसावा. 
४)  किमान दोन मोठे पशुधन (गाय/म्हैस/बैल)उपलब्ध असावेत.                     

क) आवश्यक कागदपत्रे- 
७/१२ व ८ अ.               

ड) खर्चाचा मापदंड-   
१. गांडूळ खत उत्पादन यूनिट- 
अ ) एचडीपीई व्हर्मी बेड - (१२ x ४ x २ फूट)  रु.१६०००/- असा खर्चाचा माप दंड आहे.  या मापदंडाच्या ५० टक्के किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के यापैकी जे कमी असेल ते अनुदान देय आहे. 
ब) टाकीचे बांधकाम  - (३.६ x १ x ०.७५ मी.) यासाठी मग्रारोहयो शासन निर्णय १-१०-२०१६ नुसार  रु.११५२०/-  अनुदान देय आहे. 
२. नाडेप कंपोस्ट उत्पादन युनिट-(३.६ x १.५ x ०.९ मी.) (भिंतीची जाडी ९ इंच व ७ इंच आकारमानाचे झरोके चारही बाजूस)  यासाठी मग्रारोहयो शासन निर्णय १-१०-२०१६ नुसार  रु.१०७४६/-  अनुदान देय आहे. 

इ) अर्ज कुठे करावा - 
इच्छुक शेतकऱ्यांनी  https//dbt.mahapocra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.                            

ई ) पूर्वसंमती व साहित्य सामुग्री खरेदी बाबत-  
तालुका कृषी अधिकारी हे पूर्वसंमती देतात.  लाभार्थी ने पुर्व संमती मिळाल्या नंतर तांत्रिक निकषा प्रमाणे प्रकल्पाची उभारणी करावी. त्यासाठी लागणारे साहित्य सामुग्री उपलब्ध करुन घेण्याची जबाबदारी लाभार्थ्याची आहे. तसेच यूनिट बांधकाम हे शेतकरी यांनी त्यांच्या पसंतीच्या बांधकाम व्यावसायिक अथवा स्वत: अथवा गवंडी यांचे मार्फत करावे.                           

फ) अनुदान मिळणे साठी-  
लाभार्थीने  यूनिट ची उभारणी झाल्यानंतर ऑनलाईन अनुदान मागणी उपविभागीय कृषी अधिकारी यांचे कडे करावी. सोबत आवश्यक देयके शेतकरी यांनी स्वत: ची स्वाक्षरी करुन ऑनलाईन अपलोड करावीत.अनुदान थेट लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येइल.

अधिक माहितीसाठी -