सामूहिक शेततळे (राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत)
राष्ट्रिय फलोत्पादन अभियान अंतर्गत सामुहिक शेततळे
अ. योजनेत कोण सहभागी होऊ शकतात -
1. लाभ हा शेतकरी समूहाला देय आहे.
2. लाभार्थी संयुक्त कुटुंबातील नसावेत, ते वेगवेगळ्या कुटुंबातील असावेत. तसेच त्यांचे जमीन धारणेबाबतचे खाते उतारे स्वतंत्र असावेत .
3. सामुदायिक शेततळे २ अथवा अधिक लाभार्थ्याने करणे आवश्यक आहे.
4. जेवढे क्षेत्र लाभार्थी समूहाकडे असेल तेवढ्या क्षेत्रासाठी आवश्यक क्षमतेचे सामुदायिक शेततळे घेता येईल.
5. शेततळ्यातील पाणी वापराबद्दल तसेच शेततळ्याच्या जमिनीबद्दल लाभार्थींमध्ये आपसामध्ये सामंजस्याचा करार करावा.
6. शेतकरी समूहाकडे फलोत्पादन पिके असणे आवश्यक आहे.
ब) अर्ज कुठे करावा - इच्छुक शेतकऱ्यांनी https//mahadbt.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
क) आवश्यक कागदपत्रे - 7/12, 8 अ, आधार कार्ड, आधार संलग्न राष्ट्रीयीकृत बैंक खाते पासबूक च्या प्रथम पानाची छायांकीत प्रत, विहित नमुन्यातील हमिपत्र, संवर्ग प्रमाणपत्र(अजा/अज शेतकरी यांचे साठी). ऑनलाईन नोंदणी करतानाच ही कागदपत्रे अपलोड करावीत.
ड) पुर्वसंमती व करावयाची कामे-
तालुका कृषी अधिकारी यांचे कडून ऑनलाईन पुर्व संमती प्राप्त झाल्यानंतर 10 दिवसाचे आत वरिल कागद पत्रां सह प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी कार्यालयास सादर करावा.
पुर्वसंमती मिळाल्यापासून 15 दिवसाच्या आत काम सुरु करावे व 4 महिन्याच्या आत पुर्ण करावे.
शेततळे खोदाई, अस्तरिकरण, आणि कुंपण करणे इ. कामे झाल्यानंतर संबंधीत कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी यांना कळवावे.
पुर्व संमती मिळाल्यानंतर शेतकरी बँकेचे कर्ज घेऊ शकतील.
शेतकरी यांना कर्ज मंजूर करण्यात अडचण असल्यास शेतकरी यांचे संमतीने अनुदानाची रक्कम बँक कर्ज खात्यात जमा करण्याची हमी तालुका कृषी अधिकारी देतील.
शेततळ्यासाठी BIS Standard 500 मायक्रॉन रीइनफोर्सड जिओ मेंबरेन फिल्म IS 15351:2015 TypeII या दर्जाची वापरणे आवश्यक आहे. शेतकरी यांना अधिकृत फिल्म पुरवठा दारां ची यादी तालुका कृषी अधिकारी हे उपलब्ध करुन देतील. शेतकरी यांना त्यांच्या पसंती नुसार विहित दर्जाच्या अस्तरी करणासाठी वापरावयाच्या फिल्म चे उत्पादक निवडण्याचा अधिकार राहिल.
इ ) अनुदान वितरण-
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी स्तरावरुन देय अनुदान pfms प्रणाली द्वारे थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येइल.
शेततळे खोदकाम , अस्तरिकरण व तार कुंपण ही सर्व कामे पुर्ण झाल्यानंतर एकाच टप्प्यात अनुदान देण्यात येइल.
मंजूर आकारमाना पेक्षा मोठे शेततळे खोदल्यास अधिकचा खर्च शेतकरी स्वत: करतील.
प्लास्टीक फिल्म चा पुरवठा दर रु.77 प्रती चौ.मी. आणि फिल्म बसविण्यासाठी रु.18 प्रती चौ.मी. असा एकुण रु.95 प्रती चौ.मी. दर निश्चीत करण्यात आला आहे.
ई) मापदंड व अनुदान- शेततळ्या साठी ७५ टक्के अनुदान आहे.
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती संवर्गातील शेतकरी यांना फलोत्पादन पिके सध्या असण्याची अट शिथिल आहे. मात्र संबंधीत शेतकरी यांनी भविष्यात फलोत्पादन पिके घेण्यावीषयी हमी पत्र द्यावे.