राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान - अन्नधान्य पिके
राष्ट्रिय अन्नसूरक्षा अभियान- अन्नधान्य पिके
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कोणत्या पिकांसाठी राबवले जात आहे-
हे अभियान भात, गहू, कडधान्य, भरडधान्य (मका) व पौष्टिक तृणधान्य( ज्वारी, बाजरी, रागी) व भात पड क्षेत्रवार कडधान्य उत्पादन वाढविणे (TRFA कडधान्य ) या पिकांसाठी राबविण्यात येत आहे.
राष्ट्रिय अन्नसुरक्षा अभियान हे राज्यातील कोणत्या जिल्ह्यात कोणत्या पिकांसाठी राबवण्यात येत आहे-
सदर अभियान राबवण्यासाठी निधीची उपलब्धता कशा प्रकारे होते-
सदर अभियानासाठी अर्थ सहाय्य केंद्र हिस्सा 60 टक्के व राज्य हिस्सा 40 टक्के असा आहे.
सदर अभियानाचा उद्देश काय आहे-
वरिल पिकांचे क्षेत्र व उत्पादकता वाढावी या उद्देशाने या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
या अभियानात कोणत्या बाबी किंवा घटक शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येतात-
या अभियानात शेतकऱ्यांच्या शेतात पीक प्रात्यक्षिके, प्रमाणित बियाणे वितरण, प्रमाणित बियाणे उत्पादन, पीक पद्धतीवर आधारित प्रशिक्षण (शेतीशाळा), सूक्ष्म मूलद्रव्ये, जिप्सम, जैविक खते , पीक संरक्षण औषधे, तणनाशके, पंपसंच, पाईप, गोदाम बांधकाम, दाल मिल, बीज प्रक्रिया संच,मका सोलणी यंत्र, क्लिनर कम ग्रेडर, रीपर ,थ्रेशर, पॉवर टिलर, ट्रॅक्टर, रोटाव्हेटर,पेरणी यंत्र, बहुपीक मळणी यंत्र इ. बाबी शेतकऱ्यांसाठी अनुदानावर राबविण्यात येतात.
या बाबीं साठी शेतकऱ्यांना अनुदान किती मिळते-
१. पीक प्रात्यक्षिकांसाठी मिळणारे अनुदान (रु.)-
पिक प्रात्यक्षिकां साठी विभागिय स्तरावर कृषी विद्यापीठाच्या सल्ल्यानुसार जिल्हा/तालुका/पिक निहाय निर्धारित तंत्रज्ञान पैकेज नुसार सर्व घटक अंमलबजावणी साठी हे अनुदान आहे. रासायनिक खतावरिल खर्च लाभार्थी शेतकरी यांनी स्वत: करावयाचा आहे त्यासाठी अनुदान देय नाही.
२. प्रमाणित बियाणे वितरण यासाठी अनुदान -
३. प्रमाणित बियाणे उत्पादन करण्यासाठी अनुदान -
हे अनुदान महाबीज,राष्ट्रीय बीज निगम,कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे,नोंदणीकृत शेतकरी उत्पादक संघ/शेतकरी उत्पादक कंपनी व कृषी विज्ञान मंडळ यांना देण्यात येते. या बीजोत्पादक संस्थांनी बियाणे उत्पादन कार्यक्रमाची नोंदणी बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे करणे आवश्यक आहे.
मागील १० वर्षाच्या आतील राज्यासाठी अधिसूचित झालेल्या व शिफारस केलेल्या वाणांचे राज्यातच उत्पादन केलेल्या वाणांसाठी हे अनुदान देण्यात येते. बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडील मुक्तता अहवालाच्या आधारे हे अनुदान देण्यात येते.
तूर,मूग,उडीद, हरभरा या कडधान्य पिकांचे प्रमाणित बियाणे उत्पादन करण्यासाठी रु. ५००० प्रती क्विंटल याप्रमाणे अनुदान तर ज्वारी बाजरी नाचणी वरई या पिकांचे प्रमाणित बियाणे उत्पादन करण्यासाठी किमतीच्या ५० टक्के कमाल रु. ३००० प्रति क्विंटल इतके अनुदान देण्यात येते.
बीजोत्पादक संस्थेने बीजोत्पादन कार्यक्रम शेतकऱ्यांच्या शेतावर घेतला असल्यास संस्थेने नोंदणी शुल्क,बियाणे प्रक्रिया इ.साठी २५ टक्के रक्कम स्वतः कडे ठेवावी व उर्वरीत रक्कम शेतकऱ्यांच्या आधार संलग्न राष्ट्रीयीकृत बँक खात्यावर जमा करावी.
४. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणेसाठी अनुदान -
यामध्ये सूक्ष्म मुल द्रव्ये, जिप्सम, व जैविक खते या बाबींचा समावेश होतो.
४ अ . सूक्ष्म मुल द्रव्ये वापर करणेसाठी अनुदान -
भात गहू कडधान्य भरडधान्य पौष्टिक तृणधान्य या पिकांसाठी सूक्ष्म मुल द्रव्याच्या वापरासाठी किमतीच्या 50 टक्के किंवा कमाल रु. 500 प्रती हे. अनुदान देय आहे. त्यासाठी लाभार्थी शेतकरी गटाने शिफारशी प्रमाणे सूक्ष्म मुल द्रव्ये खुल्या बाजारातून त्यांच्या पसंतीने खरेदी करावीत व त्यानंतर गटातील शेतकरी यांच्या आधार संलग्न राष्ट्रियिकृत बँक खात्यात अनुदान थेट जमा करण्यात येइल. लाभार्थी शेतकरी यांनी कृषी निविष्ठांची खरेदी कैशलेस पद्धतीने अथवा रोखीने करावी. लाभार्थी शेतकरी यांनी वस्तू व सेवा कर क्रमांक असलेली खरेदी पावती सादर करणे बंधनकारक राहिल. तसेच एका लाभार्थी शेतकरी यांना एका वर्षात सर्व बाबी मिळून जास्तित जास्त 5 हेक्टर पर्यंत लाभ घेता येइल.
४ ब . जिप्सम वापर करण्यासाठी अनुदान -
कडधान्य पिकांकरीता (तूर, मूग, उडीद, हरभरा) जिप्समचा वापर जमीन आरोग्य पत्रिकेतील शिफारशी नुसार करावा. जिप्सम च्या वापरासाठी किमतीच्या 50 टक्के , कमाल रु. 750 प्रती हे. अनुदान देय आहे.लाभार्थी शेतकरी गटाने शिफारशी प्रमाणे खुल्या बाजारातून त्यांच्या पसंतीने खरेदी करावी व त्यानंतर गटातील शेतकरी यांच्या आधार संलग्न राष्ट्रियिकृत बँक खात्यात अनुदान थेट जमा करण्यात येइल.
४क.-जैविक खते वापर करणेसाठी अनुदान -
सदर बाब फक्त कडधान्य (तूर,मूग,उडीद,हरभरा) व पौष्टिक तृण धान्य (ज्वारी,बाजरी,नाचणी, वरई ) कार्यक्रमासाठी लागू आहे.
कृषी विभागाच्या जैविक प्रयोगशाळे मार्फत पिक गटास आवश्यक द्रवरुप जैविक खते/जैविक खते संघ (liquid consortia) तयार करण्यात येत असुन सदर खतांची बीज प्रक्रिया केल्यास उत्पादन खर्चात बचत करुन पिकांच्या उत्पादकतेत वाढ होते.
द्रवरुप जीवाणू संघ (liquid consertia) यामध्ये नत्र स्थिरी करण करणारे, स्फूरद विरघळविणारे व जस्त विरघळविणारे जीवाणू उपलब्ध करुन देणारे यापैकी कमीत कमी दोन किंवा अधिक जिवाणुंचा समावेश असतो.
शेतकरी गटाने जीवाणू खतांची खरेदी प्रथम प्राधान्याने शासकीय प्रयोग शाळा, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र यांच्या कडून करावी.
शेतकरी यांना खुल्या बाजारातुन जीवाणू खते खरेदी करावयाची असल्यास किमतीच्या 50 टक्के किंवा कमाल रु.300 प्रती हेक्टर अनुदान देय आहे.
शेतकरी गटाने खुल्या बाजारातून त्यांच्या पसंतीने खरेदी करावीत व त्यानंतर गटातील शेतकरी यांच्या आधार संलग्न राष्ट्रियिकृत बँक खात्यात अनुदान थेट जमा करण्यात येइल.
५ .एकात्मिक किड/रोग व्यवस्थापन करणेसाठी अनुदान -
५ अ . किडनाशके खरेदीसाठी अनुदान -
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान -अन्नधान्य पिके अंतर्गत सर्व पिकांसाठी हे अनुदान देय आहे. यासाठी 50 टक्के, कमाल रु.500 प्रती हेक्टर अनुदान देय आहे. लाभार्थी शेतकरी गटाने कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार खुल्या बाजारातून त्यांच्या पसंतीने लेबल क्लेम असलेल्या पीक संरक्षण औषधांची खरेदी करावी व त्यानंतर गटातील शेतकऱ्यांच्या आधार संलग्न राष्ट्रियिकृत बँक खात्यात अनुदान थेट जमा करण्यात येते .
५ ब . तण नाशके खरेदीसाठी अनुदान -
भात गहू कडधान्य भरडधान्य पौष्टिक तृणधान्य या पिकांसाठी तण नाशकाच्या वापरासाठी किमतीच्या 50 टक्के , कमाल रु.500 प्रती हे. अनुदान देय आहे. त्यासाठी लाभार्थी शेतकरी गटाने खुल्या बाजारातून त्यांच्या पसंतीने लेबल क्लेम असलेल्या तण नाशकांची खरेदी करावी व त्यानंतर गटातील शेतकरी यांच्या आधार संलग्न राष्ट्रियिकृत बँक खात्यात अनुदान थेट जमा करण्यात येइल.
६ .कृषी औजारे तसेच पंप संच व पाईप खरेदी करण्यासाठी अनुदान -
यासाठी mahadbtmahait.gov.in या महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे.
६. पिक पद्धतीवर आधारित शेतकरी प्रशिक्षण व इतर बाबी -
७. प्रकल्प व्यवस्थापन चमू- जिल्हा स्तरावर १ तंत्र सल्लागार व २ तंत्र सहाय्यक.
८ . स्थानिक पुढाकाराच्या बाबी-
---××---