शेतीशाळा
शेतीशाळा - शेतीशाळा म्हणजे काय ? शेतकरी जे पिक घेतात त्या पिकामध्ये तज्ञ बनवण्याचं एक प्रभावी माध्यम म्हणजे शेतिशाळा आहे. शेती शाळा ही प्रत्यक्ष शेतावर घेतली जाते. यासाठी प्रगतीशील शेतकरी यांचे एक एकर चे क्षेत्र निवडले जाते. या क्षेत्रावरच गावातील जवळपासचे त्या पिकाचे किमान २५ शेतकरी त्या हंगामात त्या पिकाच्या पेरणी पासून ते मळणी पर्यंत एकत्र येतात व पिकाच्या वेगवेगळ्या अवस्था उदा. पेरणीपुर्व, पेरणी, शाकीय वाढ, फुले लागणे, दाणेभरणे/बोंडे लागणे, पक्वता तोडणी काढणीपश्चात अशा महत्वाच्या अवस्थेमध्ये एकुण ६ वर्ग शेतावरच आयोजित होतात. एक वर्ग किमान ४ तासाचा असतो. या शेती शाळेत कमीत कमी व्याख्याने आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून अनुभवातून शिक्षण अभिप्रेत आहे. या निवडलेल्या क्षेत्रावर सुधारीत तंत्रज्ञानाचे पथदर्शी प्रात्यक्षिक आयोजित केले जाते. यामध्ये नैसर्गिक शेती, एकात्मिक पिक व्यवस्थापन, एकात्मिक किड व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन इ .बाबींचा अवलंब केला जातो. शेतकरी या क्षेत्रावर एकत्र येउन आपापले या सुधारित तंत्रज्ञानाबाबातचे तसेच पिकाबाबतचे अनुभव, चांगले...