Total Pageviews

प्लास्टिक मल्चींग (राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत)

राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत प्लास्टिक मल्चिंग


    फळझाडांच्या/भाजीपाला पिकांच्या सभोवती, जमिनीवर मल्चिंगसाठी तयार केलेली प्लास्टिक फिल्म टाकल्यावर पाण्याचा बाष्पीभवनामुळे होणारा ऱ्हास टाळता येतो. तसेच त्यामुळे तणांची वाढ होत नाही.


१. सदर योजनेचा  लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी हॉर्टनेट (http://www.hortnet.gov.in)  या ऑनलाईन संकेतस्थळावर नोंदणी करावी. 


२. अर्थसहाय्यचे  स्वरूप - 

अ . सर्वसाधारण क्षेत्रसाठी प्रति हेक्टरी मापदंड रुपये ३२०००/- असून या खर्चाच्या ५० टक्के जास्तीत-जास्त रुपये  १६०००/- प्रति हेक्टर याप्रमाणे कमाल २ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत अनुदान देय आहे. 

ब . डोंगराळ क्षेत्रासाठी प्रति हेक्टरी मापदंड रुपये ३६८००/- असून या खर्चाच्या ५० टक्के जास्तीत-जास्त रुपये  १८४००/- प्रति हेक्टर याप्रमाणे कमाल २ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत अनुदान देय आहे. 


३. कोण सहभाग घेऊ शकतात  - 

अ. वैयक्तिक शेतकरी, शेतकरी समूह, शेतकरी उत्पादक कंपनी, बचत गट, सहकारी संस्था यांना अर्थसहाय्य देय  आहे 


४. ऑनलाईन  नोंदणी करतांना आवश्यक असणारे कागदपत्रे 

अ . ७/१२

ब.   ८ अ 

क.  आधार कार्डाची छायांकित प्रत 

ड. आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत


५. विविध पिकांकरिता वापरावयाची मल्चिंग फिल्म -

१. ३-४ महिने कालावधीचे पिके उदा. भाजीपाला,स्ट्रॉबेरी इ . - २५ मायक्रॉन जाडीची यु. व्ही. स्टॅबिलाइज्ड फिल्म 

२. मध्यम कालावधीत येणारी पिके (११ ते १२ महिने) उदा. फळपिकांच्या सुरुवातीचा वाढीचा कालावधी, पपई इ. - ५० मायक्रॉन जाडीची यु. व्ही. स्टॅबिलाइज्ड फिल्म 

३. जास्त कालावधीचे पिके (१२ महिन्यापेक्षा अधिक) सर्व पिके - १००/२०० मायक्रॉन जाडीची यु. व्ही. स्टॅबिलाइज्ड फिल्म 


४. शेतकऱ्यांनी  हॉर्टनेट प्रणालीवर अर्ज नोंदणी केल्यानंतर  तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे वरिल कागद पत्रांसह अर्ज सादर करावा, तालुका कृषी अधिकारी यांचेकडून पूर्व संमती मिळाल्यानंतर मल्चिंग फिल्म खरेदी करावी. देय अनुदान जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी स्तरावरून PFMS प्रणालीद्वारे थेट लाभार्थींच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्यात येईल. 




https://drive.google.com/open?id=1SsVG-p41k9pC_RB0MG4FmdpDE0Ut6GRR


अधिक माहिती साठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.