Total Pageviews

रेशिम उद्योग (पोकरा 2.0 अंतर्गत)

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत- 


रेशीम उद्योग


अ) योजनेत कोण सहभागी होऊ शकतात -


५ हेक्टर पर्यंत जमीन धारणा असलेले शेतकरी. 


तुती लागवडीसाठी लाभार्थीकडे किमान ०.४० हेक्टर जमीन असणे आवश्यक. 


सिंचनाची पुरेशी सोय उपलब्ध असणे आवश्यक. 


जर ७/१२  उताऱ्यावर लाभार्थी संयुक्त खातेदार असेल तर सर्व खातेदारांचे संमती पत्र आवश्यक


एका कुटुंबातील एकाच व्यक्तिस या योजनेचा लाभ देण्यात येइल.


यापूर्वी शासनाच्या इतर योजनेतून लाभ घेतलेला नसावा.  . 


अनुदान मिळाल्यानंतर लाभार्थ्याने  सदरचा व्यवसाय किमान ५ वर्ष करणे आवश्यक आहे.                                                 


ब) अर्थसहाय्य कोणत्या बाबींसाठी व  किती मिळते- 


तुती लागवड , रेशीम कीटक संगोपनगृह बांधकाम आणि कीटक संगोपन व निर्जंतुकीकरण साहित्य  या तीन बाबींसाठी अर्थ सहाय्य मिळते.


सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना खर्चाच्या ७५ टक्के आणि अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना  खर्चाच्या ९० टक्के  अर्थ सहाय्य देय आहे. 


अ.क्र. 

तपशील 

मापदंडा नुसार खर्च 

देय अनुदान 

सर्वसाधारण लाभार्थी ७५%

अजा/अज लाभार्थी ९०%

१ 

तुती लागवड (प्रति एकर )

६०००० 

४५००० 

५४००० 

२ 

कीटक संगोपनगृह बांधकाम (चौ. फुट)


३२५००० 

२४३७५० 

२९२५०० 

३ 

कीटक संगोपन व निर्जंतुकीकरण साहित्य 

४८५०० 

३६३७५ 

४३६५० 


एकूण 

४३३५००  

३२५१२५ 

३९०१५० 


देय अनुदान थेट लाभार्थ्याच्या  आधार संलग्न बँक खात्यात  जमा करण्यात येते.      


क) रेशीम कीटक संगोपनगृह बांधकाम  किती आकारमानाचे असावे-


    रेशीम कीटक संगोपनगृह बांधकाम  ६० फूट लांबी  x २२ फूट रुंदी  या  आकारमानाचे असावे. यामध्ये पाला साठवणुकीची खोली किमान १०x ८ फूट ची असावी. 


    रेशीम कीटक संगोपनगृहाच्या नजीकच निर्जंतुकीकरण टाकी प्लास्टरसह ५x ४x ३ फूट ची बांधणे आवश्यक आहे.                                                                    


ड ) अर्ज कुठे करावा -

इच्छुक शेतकऱ्यांनी  https//dbt.mahapocra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.      


इ) पूर्वसंमती नंतर तूती रोपे खरेदी कोठून करावी-  


लाभार्थी ने पुर्व तालुका कृषि अधिकारी यांचेकडून संमती मिळाल्यानंतर  तूती लागवड प्रकल्प उभारणी करुन 60 दिवसात ऑनलाईन अनुदान मागणी करावी. अनुदान मागणी करताना मूळ देयक अपलोड करावे. 


तूती रोपे शासकीय रेशिम फार्म, कृषि विज्ञान केंद्र, कृषि विद्यापीठे,शासकीय रोपवाटीका ,सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटीका इ. ठिकाणावरुन खरेदी करावीत. 


तूती रोपांची/बेण्यांची खरेदी व्यावसायिक तूती रोपवाटीका धारक किंवा तूती लागवड करणाऱ्या इतर शेतकऱ्यांकडून ही करता येईल. तसेच लाभार्थ्यास स्वत:च्या क्षेत्रावरही तूती रोपे तयार करण्याची मुभा राहील. मात्र तूती रोपांच्या गुणवत्ते बाबतची जबाबदारी लाभार्थ्यांची राहील. 



अधिक माहितीसाठी


मार्गदर्शक सूचना दिनांक २८-१०-२०२५