Total Pageviews

(कुक्कुट) कोंबडी पालन (पोकरा अंतर्गत)

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत- परसातील कुक्कुटपालन- 

अ) योजनेत कोण सहभागी होऊ शकतात - 
ग्राम कृषी संजीवनी समितीने मान्यता दिलेले भूमीहीन कुटुंबातील व्यक्ती, विधवा, परित्यक्ता महिला, घटस्फ़ोटीत महिला, अनुसूचित जाती/जमाती मधिल महिला शेतकरी.        
                                        
ब) अर्थसहाय्य किती मिळते- 
खुल्या प्रवर्गातील ;लाभार्थ्यासाठी प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के (कमाल रु. ८५००) व अनुसूचित जाती/जमातीतील लाभार्थी साठी प्रकल्प खर्चाच्या 75 टक्के (कमाल रु. १२७५०)अनुदान देय आहे. 
एका लाभार्थ्याने १०० पक्षी खरेदी करून निवारा सोया केल्यास पक्षी खरेदी साठी रु. १०००० व निवारा यासाठी रु. ७००० असा एकूण १७००० मापदंड आहे. . 

सर्वसाधारणपणे देशी वाणाच्या कोंबडीची चार आठवडे वयाची पिल्ले देणे अभिप्रेत आहे. चार आठवडे वयाच्या एका पिल्लाची किंमत रु.100  मर्यादेत असुन एका लाभार्थ्यास ५० किंवा ५० पेक्षा जास्त कमाल 100 पक्षी खरेदी साठी अनुदान देय आहे.  एका पिलाच्या निवार्यासाठी १ चौ . फूट जागा आवश्यक आहे. निवारा यासाठी रु. प्रति चौ .फूट. प्रमाणे मापदंड असून आवश्यकता असल्यास लाभार्थ्याने स्वतःच्या जागेवर स्वतःचे अथवा बाजारातून साहित्य उपलब्ध करून निवारा सोया करायची आहे.
एका कुटुंबातील एकाच व्यक्तिस या योजनेचा लाभ देण्यात येइल. देय अनुदान थेट लाभार्थ्याच्या   आधार संलग्न बँक खात्यात  जमा करण्यात येते.  
अर्थ साह्य मिळणे साठी ऑनलाईन मागणी करावी.सोबत खरेदी देयकांच्या मुळ प्रती व खरेदी समितिचे प्रमाणपत्र  लाभार्थ्यांने स्वस्वाक्षांकीत करुन ऑनलाईन अपलोड कराव्यात.                          

क) लाभार्थ्याने  सदरचा व्यवसाय किमान 3 वर्ष करणे आवश्यक आहे.                                              

ड ) अर्ज कुठे करावा - 
इच्छुक शेतकऱ्यांनी  https//dbt.mahapocra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.                                 

इ) खरेदी कोठून करावी-  
लाभार्थी ने पुर्व संमती मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत, पक्षी खरेदी समितीच्या उपस्थितीत स्थानिक बाजारामध्ये खरेदी करावी. ग्रामपंचायतीची पक्षी खरेदी बाबतची तपशीलासह पावती सादर करणे आवश्यक आहे. देशी वाणाची पिल्ले हि स्थानिक पुरवठादाराकडून/ अंडी उबवणी केंद्राकडून खरेदी करू शकतात. वाहतुकीचा खर्च लाभार्थीने करावा.खरेदी समिती चे अध्यक्ष  हे सरपंच असतात. उपसरपंच, ग्राम कृषी संजीवनी समिती सदस्यां पैकी 1 महिला सदस्य, कृषी मित्र/कृषी ताई, पशुधन विकास अधिकारी/पशुधन पर्यवेक्षक हे सदस्य असतात. तर कृषी सहाय्यक हे सचिव असतात.