Total Pageviews

नविन तंत्रज्ञान राबवीणे व शीतसाखळी आधुनिकीकरण (राष्ट्रिय फलोत्पादन अभियान अंतर्गत)

नविन तंत्र ज्ञान राबविणे / शीत गृह  आधुनिकीकरण (Technology induction and modernization of cold storage)-

समाविष्ट बाबी-
शीत साखळी आधुनिकीकरणामध्ये PLC उपकरणे, पैकेजींग लाइन्स, डॉक लेवलर्स, अडवान्सड ग्रेडर्स, पर्यायी तंत्रज्ञान, स्टैकींग पद्धत, आधुनिकी करण, इन्सुलेशन आणि रेफ्रिजरेशन या बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे.

माप दंड -
१. कमाल रु. १२५ लाख परंतु रेफ्रिजरेशन साठी रु. ३०००/मे . टन क्षमतेपेक्षा जास्त नाही. 
२.  कमाल रु. १२० लाख परंतु इन्शुलेशन  साठी रु. १८००/मे . टन क्षमतेपेक्षा जास्त नाही

अर्थसहाय्याचे स्वरुप- 

सर्व साधारण क्षेत्रा साठी साठवण क्षमता विचारात घेउन ग्राह्य भांडवली प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के  अर्थ साह्य . 

अधिसूचीत क्षेत्रा साठी साठवण क्षमता विचारात घेउन ग्राह्य भांडवली प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के  अर्थ साह्य .

अर्थ सहाय्यासाठी भांडवली खर्चाच्या बाबी ग्राह्य धरण्यात येतात.

पात्र लाभार्थी-  

अ. वैयक्तीक लाभार्थी- 
वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी सदर अर्थ साह्य हे बँक कर्जाशी निगडित असून (credit linked back ended subsidy) बँक कर्जाच्या परताव्याच्या स्वरूपात देय  आहे.

ब. इतर लाभार्थी - 
राज्य सहकारी संस्था, सहकारी, नोंदणीकृत संस्था, विश्वस्त संस्था, फलोत्पादन संघ, स्वयंसहायता गट (ज्यामध्ये किमान २५ सदस्य असतील), शेतकरी महिला गट, सार्वजनिक क्षेत्रातील नोंदणीकृत कंपन्या  या संस्था/कंपन्यांना  अनुदान वगळता प्रकल्पाचा इतर खर्च स्वतः उभारणार असल्यास त्यांना बँक कर्जाची अट  असणार नाही. मात्र त्यांना आर्थिकदृष्टया सक्षम असल्याचे लेखा परिक्षण केलेल्या  मागिल 3 वर्षाचे  पुरावे सादर करावे लागतील.

अर्ज कुठे करावा- तालुका कृषी अधिकारी कार्यालय