हरितगृह/शेडनेट मध्ये लागवड (राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत)
राष्ट्रिय फलोत्पादन अभियान -
हरितगृह व शेडनेट मध्ये लागवड साहित्य व मशागतीसाठी अनुदान-
अ ) क्षेत्र मर्यादा -
एका लाभार्थ्यास हरितगृह व शेडनेट मध्ये लागवड साहित्य व मशागतीसाठी अनुदान कमीत कमी ५०० चौ. मीटर व जास्तीत जास्त ४००० चौ. मीटर क्षेत्र मर्यादा पर्यंत लाभ घेता येईल.
यापूर्वी कोणताही शासकीय योजने अंतर्गत लाभ घेतला असल्यास सर्व योजना मिळून प्रति लाभार्थी जास्तीत जास्त ४००० चौ. मीटर क्षेत्र मर्यादा पर्यंतच लाभ अनुज्ञेय राहील.
ब) अर्ज कुठे करावा -
इच्छुक शेतकऱ्यांनी https//mahadbt.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
क) खर्चाचे मापदंड-
हरितगृह/शेडनेटगृहातील भाजीपाला पिकाच्या लागवडीसाठी रु. १४० प्रति चौ मीटर याप्रमाणे खर्चाचा मापदंड आहे.
तसेच हरितगृह/शेडनेटगृहातील फुल पिकाच्या कार्नेशन व जरबेरा लागवडीसाठी रु. ६१० प्रति चौ मीटर, अँथुरिअम व ऑर्चिड फुल पिकाच्या लागवडीसाठी रु. ७०० प्रति चौ मीटर याप्रमाणे खर्चाचा मापदंड आहे .
अनुदान-
वरिल प्रमाणे खर्चाच्या माप दंडा च्या 50 टक्के किंवा कमाल 4000 चौ.मी. पर्यंत लाभ एका लाभर्थ्यास देय आहे.
आवश्यक कागदपत्रे-
७/१२ उतारा
८अ
चतु:सीमा नकाशा
आधार कार्ड छायांकीत प्रत
आधार संलग्न बैंक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकीत प्रत
जात प्रमाणपत्र( अजा/अज शेतकरी यांचेसाठी)
विहीत नमुन्यातील हमीपत्र प्रपत्र-१
बंधपत्र प्रपत्र-२
अनुदान जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी स्तरावरुन लाभार्थी चे थेट बँक खात्यात पी एफ एम एस प्रणाली द्वारे जमा करण्यात येइल.
मार्गदर्शक सूचना
मार्गदर्शक सूचना