शेततळे (पोकरा अंतर्गत)
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प- शेततळे योजना- 
अ) योजनेत कोण सहभागी होऊ शकतात -           
(१) प्रकल्प गावातील अल्प/अत्यल्प भूधारक शेतकरी यांना वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी ७५ टक्के अर्थसहाय्य देय आहे.                                                               
(2) २ ते ५  हेक्टर पर्यंत जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांना  वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी ६५ टक्के अर्थसहाय्य देय आहे.    
ब) अर्ज कुठे करावा-  
इच्छुक शेतकऱ्यांनी  https//dbt.mahapocra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.        
क) लाभार्थी पात्रता- 
शेतकरी यांचेकडे किमान 0.60 हे.जमीन असावी. यापूर्वी इतर योजनांच्या माध्यमातून शेततळे/सामुहिक शेततळे/बोडी या घटकाचा लाभ घेतलेला नसावा. 
ड ) कोणत्या आकारमानाची शेततळी घेता येतात- 
15x 15x3 मी.
20x15x3 मी. 
20x20x3 मी.
25x20x3 मी.
25x25x3 मी.
30x25x3 मी.
30x30x3 मी.
इ)आवश्यक कागदपत्रे- 
7/12, 8अ.  
ई) अनुदान मर्यादा- 50000 रु.