Total Pageviews

एकात्मिक पैक हाऊस (राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत)

राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत -
एकात्मिक पैक हाऊस-

फलोत्पादीत, औषधी व सुगंधी वनस्पती मालाची काढणी झाल्यानंतर/प्राथमिक प्रक्रिया केल्यानंतर त्यांचे आवश्यकतेनुसार प्रतवारी व पैकिंग करुन पुढिल कार्यवाही करणे, तसेच फलोत्पादीत, औषधी व सुगंधी वनस्पतीचा टिकाउपणा वाढविणे यासाठी एकात्मिक पैक हाऊस ची आवश्यकता असते.

एकात्मिक पैक हाऊस बाबत माहिती-
यामध्ये फळपीके,फूलपीके, भाजीपाला, औषधी व सुगंधी वनस्पती यांच्या आवश्यकतेप्रमाणे किमान 500-600 मे.टन प्रती वर्ष या क्षमतेच्या एकात्मिक पैक हाऊस ची उभारणी करणे अपेक्षीत आहे. यामध्ये फळपिकांच्या व वनस्पतींच्या आवश्यकते प्रमाणे स्वच्छता, प्रतवारी, उत्पादनाचे मुळ रुपात बदल न करता काढणी पश्चात प्रक्रिया पैकिंग, सिलिंग, यासाठी आवश्यक असणारी यंत्रसामुग्री (कनव्हेयर बेल्ट, वाशिंग व ड्राइंग यार्ड आणि भारत्तोलन इ .), क़च्चा माल व तयार मालासाठी साठवणूक सुविधा, हाताळणी साठी आवश्यक यंत्रणा  (ट्रॉली, प्लास्टीक क्रेटस, लिफ्टर्स इ .), पाण्याची सुविधा, टाकाऊ पदार्थांचा निचरा अथवा पुनर्वापर करणारी यंत्रणा या बाबींचा समावेश राहिल.

अर्थसहाय्य- 
अधिकतम ग्राह्य प्रकल्प खर्च- रु.50 लाख.
बांधकाम क्षेत्र- 9×18 मी.
सर्व साधारण क्षेत्रा साठी साठवण क्षमता विचारत घेउन ग्राह्य प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के किंवा कमाल रु.17.50 लाख अर्थ साह्य देय आहे.

डोंगराळ व अधिसूचीत क्षेत्रा साठी साठवण क्षमता विचारत घेउन ग्राह्य प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल रु.25 लाख अर्थ साह्य देय आहे.

अर्थ सहाय्यासाठी भांडवली खर्चाच्या बाबी ग्राह्य धरण्यात येतात.

२. अर्थसहाय्य -  

अ. वैयक्तीक लाभार्थी- 
वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी सदर अर्थ साह्य हे बँक कर्जाशी निगडित असून (credit linked back ended subsidy) बँक कर्जाच्या परताव्याच्या स्वरूपात देय  आहे.

ब. इतर लाभार्थी - 
राज्य सहकारी संस्था, सहकारी, नोंदणीकृत संस्था, विश्वस्त संस्था, फलोत्पादन संघ, स्वयंसहायता गट (ज्यामध्ये किमान २५ सदस्य असतील), शेतकरी महिला गट, सार्वजनिक क्षेत्रातील नोंदणीकृत कंपन्या  या संस्था/कंपन्यांना  अनुदान वगळता प्रकल्पाचा इतर खर्च स्वतः उभारणार असल्यास त्यांना बँक कर्जाची अट  असणार नाही. मात्र त्यांना आर्थिकदृष्टया सक्षम असल्याचे लेखा परिक्षण केलेल्या  मागिल 3 वर्षाचे  पुरावे सादर करावे लागतील.