Total Pageviews

शीत वाहन (refrigerated transport vehicle) (राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत)

शीत वाहन (Refrigerated Transport Vehicle)-

उद्देश-
1.वाहतुकी दरम्यान फळे, फुले, भाजीपाला, औषधी व सुगंधी वनस्पती यासारख्या नाश वंत मालाचे दर्जा टिकवुन ठेउन आयुष्य वाढविणे व होणारे नुकसान टाळणे.
2. किमान 4 मे.टन  ते कमाल 9 मे.टन क्षमते पर्यंतच्या शीत वाहनाकरिता अनुदान देय राहिल.
3. वाहन खरेदी तसेच वाहनावर उपलब्ध करुन घ्यावयाच्या रेफ्रिजरेशन व इतर अनुषंगिक सुविधांसाठी अनुदान देय राहिल.

माप दंड व अर्थसहाय्याचे स्वरुप- 

अधिकतम  ग्राह्य प्रकल्प खर्च- रु.26 लाख.
सर्व साधारण क्षेत्रा साठी साठवण क्षमता विचारात घेउन ग्राह्य भांडवली प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के किंवा कमाल रु.9.10 लाख अर्थ साह्य देय आहे.

डोंगराळ व अधिसूचीत क्षेत्रा साठी साठवण क्षमता विचारात घेउन ग्राह्य भांडवली प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल रु.13 लाख अर्थ साह्य देय आहे.

अर्थ सहाय्यासाठी भांडवली खर्चाच्या बाबी ग्राह्य धरण्यात येतात.

पात्र लाभार्थी-  

अ. वैयक्तीक लाभार्थी- 
वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी सदर अर्थ साह्य हे बँक कर्जाशी निगडित असून (credit linked back ended subsidy) बँक कर्जाच्या परताव्याच्या स्वरूपात देय  आहे.

ब. इतर लाभार्थी - 
राज्य सहकारी संस्था, सहकारी, नोंदणीकृत संस्था, विश्वस्त संस्था, फलोत्पादन संघ, स्वयंसहायता गट (ज्यामध्ये किमान २५ सदस्य असतील), शेतकरी महिला गट, सार्वजनिक क्षेत्रातील नोंदणीकृत कंपन्या  या संस्था/कंपन्यांना  अनुदान वगळता प्रकल्पाचा इतर खर्च स्वतः उभारणार असल्यास त्यांना बँक कर्जाची अट  असणार नाही. मात्र त्यांना आर्थिकदृष्टया सक्षम असल्याचे लेखा परिक्षण केलेल्या  मागिल 3 वर्षाचे  पुरावे सादर करावे लागतील.

लाभार्थीने सदर वाहनाची नोंद R.T.O. कडे "Goods  carriee" म्हणून करणे बंधनकारक आहे. तसेच प्रकल्पासाठी आवश्यक फलोत्पादीत ,औषधी व सुगंधी वनस्पती पिकांची बैकवर्ड व फ़ॉरवर्ड लिन्केजेस असणे आवश्यक आहे.

अर्ज कुठे करावा- तालुका कृषी अधिकारी कार्यालय