Total Pageviews

रायपनींग चेंबर (ripening chamber) (राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत)

रायपनींग चेंबर (Ripening chamber)-

उद्देश-
1. इथिलीन सारख्या नैसर्गिक सम्प्रेरकाचा (natural hormone) वापर करुन केळी, आंबा, पपई इ .फळपीकांना गरजे नुसार पिकवता येते.
2. फळांतील रस, गर  साल इ .एक संघ पिकत असल्यामूळे फळांचा टिकाऊ पणा वाढतो.
3.फळांच्या वजना मध्ये कमीत कमी घट आणि फळांची गोडी, चव व आकर्षक पणा वाढतो.

माप दंड- 

अधिकतम  ग्राह्य प्रकल्प खर्च- रु.1लाख प्रती मे. टन आणि प्रती यूनिट कमाल प्रकल्प क्षमता- 300 मे.टन.

अर्थसहाय्याचे स्वरुप- 

सर्व साधारण क्षेत्रा साठी साठवण क्षमता विचारात घेउन ग्राह्य भांडवली प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के किंवा कमाल रु.105 लाख अर्थ साह्य देय आहे.

डोंगराळ व अधिसूचीत क्षेत्रा साठी साठवण क्षमता विचारात घेउन ग्राह्य भांडवली प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल रु.150 लाख अर्थ साह्य देय आहे.

अर्थ सहाय्यासाठी भांडवली खर्चाच्या बाबी ग्राह्य धरण्यात येतात.

पात्र लाभार्थी-  

अ. वैयक्तीक लाभार्थी- 
वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी सदर अर्थ साह्य हे बँक कर्जाशी निगडित असून (credit linked back ended subsidy) बँक कर्जाच्या परताव्याच्या स्वरूपात देय  आहे.

ब. इतर लाभार्थी - 
राज्य सहकारी संस्था, सहकारी, नोंदणीकृत संस्था, विश्वस्त संस्था, फलोत्पादन संघ, स्वयंसहायता गट (ज्यामध्ये किमान २५ सदस्य असतील), शेतकरी महिला गट, सार्वजनिक क्षेत्रातील नोंदणीकृत कंपन्या  या संस्था/कंपन्यांना  अनुदान वगळता प्रकल्पाचा इतर खर्च स्वतः उभारणार असल्यास त्यांना बँक कर्जाची अट  असणार नाही. मात्र त्यांना आर्थिकदृष्टया सक्षम असल्याचे लेखा परिक्षण केलेल्या  मागिल 3 वर्षाचे  पुरावे सादर करावे लागतील.

अर्ज कुठे करावा- तालुका कृषी अधिकारी कार्यालय