Total Pageviews

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत
कृषी यांत्रिकीकरण- (ट्रॅक्टर व इतर औजारांसाठी अनुदान)

अर्ज कुठे करावा- 
अर्ज https://dbt.mahapocra.gov.in या वेबसाईट वर ऑनलाईन अर्ज करावा.

ऑनलाईन अर्जा सोबत कोणती कागद पत्रे अपलोड करावीत-
7/12, 8अ, (संवर्ग प्रमाणपत्र- अजा व अज शेतकरी यांचे साठी).

अर्जांना मान्यता कोंण देईल-
सरपंच यांचे अध्यक्षतेखालील ग्राम कृषी संजीवनी समिती.

कोणकोणती औजारे अनुदानावर मिळतील-
ट्रॅक्टर+बीबीएफ यंत्र, पॉवर टीलर, रिपर कम बाइन्डर, पॉवर वीडर, रिपर, ब्रश कटर, थ्रेशर, पलटी नांगर, शुगरकेन थ्रेश कटर, रोटाव्हेटर, कॉटन श्रेडर, स्ट्रॉ रिपर, मिनी दाल मिल, ऑईल मिल फ़िल्टर प्रेस सहित इत्त्यादी.

लाभार्थी पात्रता-
ट्रॅक्टर+ बीबीएफ  साठी- 
१. अर्ज करणारे शेतकरी यांचेकडे किमान १ हेक्टर जमीन धारणा असणे बंधनकारक आहे. 
२. अर्जदारास ट्रॅक्टरसोबत बीबीएफ यंत्रासाठी देखील अर्ज करणे बंधनकारक आहे. 
३. अर्जदाराचे कुटुंबातील सदस्यांच्या नावे ट्रॅक्टर असल्यास अर्ज करता येणार नाही. (कुटुंब म्हणजे आई वडील व त्यांच्यावर अवलंबून असलेली अविवाहित अपत्य)
४. ट्रॅक्टर खरेदी साठी एका कुटुंबातील फक्त एका सदस्यास अर्ज करता येईल. 
५. गावातील प्रति २०० हेक्टर निव्वळ पेरणी क्षेत्राकरिता एक ट्रॅक्टर याप्रमाणे प्रति गाव कमाल १० ट्रॅक्टर देण्यात येतील. 
इतर औजारांसाठी-
१. इतर कोणत्याही योजनेतून त्याच औजारांसाठी लाभ घेतलेला नसावा. 
२. प्रकल्प कालावधीमध्ये एक शेतकरी यांना ट्रॅक्टरचलीत यंत्र/ औजारांपैकी बीबीएफ यंत्राशिवाय कोणत्याही एका यंत्र /औजारांसाठी अर्ज करता येईल.
३. ट्रॅक्टर चलित यंत्र /औजारे मागणी करणारे शेतकरी यांचेकडे किंवा कुटुंबातील सदस्यांकडे सदर यंत्र/औजारे चालविण्यासाठी आवश्यक अश्वशक्तीचा ट्रॅक्टर असणे अनिवार्य आहे. त्यासाठीची आरसी आवश्यक आहे. 
४. एका कुटुंबातील फक्त एका सदस्यास अर्ज करता येईल. 

अनुदान किती मिळेल-


अनुदान मर्यादा - 
अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती /महिला/ २ हेक्टर पर्यंत जमीन धारणा असणारे शेतकरी  याना 50 टक्के व २ ते ५ हेक्टर पर्यंत जमीन धारणा असणारे शेतकरी याना 40 टक्के. 

अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती /महिला/ २ हेक्टर पर्यंत जमीन धारणा असणारे शेतकरी  -

अ. ट्रॅक्टर -125000/-


ब. पॉवर टिलर - 
8 बीएचपी व त्यापेक्षा जास्त - 85000/-
8 एच पी पेक्षा कमी - 65000/-


क. स्वयंचलित अवजारे
रिपर कम बाइन्डर (4 व्हील) - 250000/-
रिपर कम बाइन्डर (3 व्हील) - 175000/-
रीपर - 75000/-
पॉवर वीडर (5 एचपी पेक्षा जास्त) - 63000/-
पॉवर वीडर (2 एचपी ते 5 एचपी) - 35000/-
पॉवर वीडर (2 एचपी पेक्षा कमी ) - 25000/-


ड. 35 एच पी ट्रॅक्टर वरील अवजारे
रोटाव्हेटर 5 फुट - 42000/-
रोटाव्हेटर 6 फुट - 44800/-
श्रेडर/बहू पिक मळणी - 100000/-
पेरणी यंत्र 9 दाती - 21300/-
रेजड बेड प्लांटर (बीबीएफ यंत्र)- 35000/-
कल्टीव्हेटर - 50000/-
पलटी नांगर हायड्रॉलिक 2 बॉटम - 70000/-
पलटी नांगर हायड्रॉलिक 3 बॉटम - 89500/-
पलटी नांगर मेकॅनिकल 2 बॉटम - 40000/-
नांगर मेकॅनिकल 3 बॉटम - 50000/-
ट्रॅक्टर ऑपरेटेड स्प्रेयर (एयर केरियेर/एयर असिस्ट)- 125000/-
ट्रॅक्टर ऑपरेटेड स्प्रेयर (बूम टाइप)- 37000/-
विडर - 75000/-
मिनी दाल मिल-150000/- (६०%)
मिलेट मिल - ५४०००० (६०%)
ऑइल मिल फिल्टर प्रेस सहित (सर्व प्रकारच्या फलोत्पादन/अन्नधान्य/गळीत पिकांसाठी)- ३००००० (६०%)

२ ते ५ हेक्टर पर्यंत जमीन धारणा असणारे शेतकरी-

अ. ट्रॅक्टर -100000/-


ब. पॉवर टिलर
8 एचपी पेक्षा जास्त - 70000/-
8 एच पी पेक्षा कमी - 50000/-


क. स्वयंचलित अवजारे
रिपर कम बाइन्डर (4 व्हील) - 200000/-
रिपर कम बाइन्डर (3 व्हील) - 140000/-
रीपर - 60000/-
पॉवर वीडर (5 एचपी पेक्षा जास्त) - 50000/-
पॉवर वीडर (2 एचपी ते 5 एचपी) - 30000/-
पॉवर वीडर (2 एचपी पेक्षा कमी ) - 20000/-


ड. 35 एच पी ट्रॅक्टर वरील अवजारे
रोटाव्हेटर 5 फुट - 34000/-
रोटाव्हेटर 6 फुट - 35800/-
श्रेडर/बहू पिक मळणी - 80000/-
पेरणी यंत्र 9 दाती - 17000/-
रेजड बेड प्लांटर (बीबीएफ यंत्र)- 30000/-
कल्टीव्हेटर - 40000/-
पलटी नांगर हायड्रॉलिक 2 बॉटम - 56000/-
पलटी नांगर हायड्रॉलिक 3 बॉटम - 71600/-
पलटी नांगर मेकॅनिकल 2 बॉटम - 32000/-
नांगर मेकॅनिकल 3 बॉटम - 40000/-
ट्रॅक्टर ऑपरेटेड स्प्रेयर (एयर केरियेर/एयर असिस्ट)- 100000/-
ट्रॅक्टर ऑपरेटेड स्प्रेयर (बूम टाइप)- 28000/-
विडर - 60000/-
मिनी दाल मिल-125000/- (५०%)
मिलेट मिल - ४५०००० (६०%)

ऑइल मिल फिल्टर प्रेस सहित (सर्व प्रकारच्या फलोत्पादन/अन्नधान्य/गळीत पिकांसाठी)- २५०००० (५०%)

अधिक माहिती साठी मार्गदर्शक सूचना