पोकरा 2.0 अंतर्गत बिजोत्पादन करणे साठी अनुदान-
पोकरा अंतर्गत पायाभूत व प्रमाणित बियाण्यांचे बिजोत्पादन करण्यासाठी अनुदान-
अ. लाभ कोण घेऊ शकतात-
शासकीय, सहकारी, निमशासकीय संस्थांच्या किंवा शेतकरी उत्पादक कंपनीच्या बिजोत्पादन कार्यक्रमांतर्गत सहभागी शेतकरी तसेच थेट बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे SATHI पोर्टलवर नोंदणी करुन बिजोत्पादन कार्यक्रम घेणारे शेतकरी.
शेतकरी यांचे कडे आवश्यक संरक्षित सिंचन स्त्रोत उपलब्ध असणे गरजेचे आहे.
शेतकरी यांना जमीन धारणेची अट नाही.
ब. कोणत्या बाबींसाठी अनुदान मिळेल-
1. पैदासकार/पायाभूत बियाण्याची किंमत
2. पायाभूत/प्रमाणित बियाणे उत्पादना साठी बीज प्रमाणीकरण यंत्रणेने आकारलेले शुल्क (नोंदणी शुल्क,तपासणी शुल्क इ.)
क. अर्ज कुठे करावा आणि अर्ज करण्याची मुदत -
बीजोत्पादन कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी बीजोत्पादन यंत्रणा/संस्था/शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे SATHI पोर्टलवर नोंदणी करावी.
SATHI पोर्टलवर नोंदणी च्या अंतिम तारखा-
खरीप-मूग उडीद-२५ जुलै
खरीप- कापूस ,सोयाबीन, ज्वारी ,बाजरी, भुईमूग, तूर,मका,कांदा - ३१ जुलै
खरीप- धान -२० ऑगस्ट
खरीप- सूर्यफूल व इतर खरीप पिके - ३१ ऑगस्ट
रबी - करडई, रबी ज्वारी- ३१ ऑकटोबर
रबी -हरभरा- २० नोव्हेंबर
रबी - गहू व इतर रबी पिके- १५ डिसेंबर
उन्हाळी पिके- पेरणीपासून १५ दिवसाच्या आत
त्यानंतर अर्ज https://dbt.mahapocra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन करावा.
अर्ज करण्याची मुदत-
खरीप हंगाम- १५ सप्टेंबर
रबी हंगाम- ३१ डिसेंबर
उन्हाळी हंगाम- १५ फेब्रुवारी
ड . ऑनलाईन केलेल्या अर्जांना मान्यता कोण देइल-
तालुका कृषी अधिकारी हे पुर्वसंमती देतील(बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे केलेली SATHI पोर्टलवर केलेली नोंदणी हाच मुख्य निकष विचारात घेउन).
पुर्व संमती नंतर बियाणे उत्पादक यंत्रणे च्या /संस्थेच्या मार्गदर्शनानुसार शेतकरी यांनी पैदासकार/पायाभूत बियाणे खरेदी करुन प्रत्यक्ष उत्पादन कार्यक्रम राबवावा.
इ . अनुदान किती मिळेल-
वरील दोन बाबीं वरील प्रत्यक्ष खर्चाच्या 100 टक्के किंवा कमाल रु. 15000 प्रती हेक्टर इतके अनुदान मिळेल. एका खातेदारास एका हंगामामध्ये कमाल 10 हेक्टर बिजोत्पादन क्षेत्र मर्यादेपर्यंत कमाल रु.1.5 लाख अनुदान मिळेल.
बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे SATHI पोर्टलवर नोंदणीकृत क्षेत्रापैकी प्रत्यक्ष बीजोत्पादनाखाली असलेले क्षेत्र अर्थसहाय्यासाठी पात्र असेल.
ई. अनुदान मागणी कशी करावी-
बीजोत्पादक शेतकऱ्यांनी उत्पादीत झालेले बियाणे संबंधीत यंत्रणेस (महाबीज/एफपीसी) हस्तांतरीत करणे बंधनकारक आहे.
बिजोत्पादक शेतकरी यांनी उत्पादीत झालेले बियाणे संबंधीत यंत्रणेस (महाबीज/एफपीसी) हस्तांतरीत केल्यानंतर अनुदान मागणी ऑनलाईन पद्धतीने करावी व खालील कागदपत्रे अपलोड करावीत-
१. पैदासकार/ पायाभूत बियाणे खरेदी पावतीची मुळ प्रत.
२. बीज प्रमाणीकरण यंत्रणे कडे शुल्क अदा केल्याच्या पावतीची मुळ प्रत.
३. बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडील तपासणी अहवाल.
४. बीजोत्पादक शेतकऱ्याने संबंधीत बीजोत्पादन संस्थेस बियाणे हस्तांतरण केल्याची पावती.
अनुदान थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात डीबिटी प्रणाली द्वारे वर्ग करण्यात येते.
अधिक माहिती साठी