डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गीक शेती मिशन -
राज्य पुरस्कृत- डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गीक शेती मिशन -
सेंद्रीय शेतीची आवश्यकता का आहे-
अन्नधान्याच्या आणि संकरित वाणांच्या तसेच इतर पिकांच्या अधिक उत्पादनासाठी रासायनिक खते, कीटक नाशके, बुरशी नाशके आणि तण नाशकांचा मोठ्या प्रमाणात असंतुलित वापर, पाण्याचा जास्त वापर, जमिनीची धुप,सेंद्रीय खतांचा कमी वापर अथवा अजिबात वापर न करणे, एकच पिक वारंवार घेणे इत्यादी कारणांमुळे पर्यावरणाचे संतूलन बिघडून जमिनीतील जैविक घटकांचा विनाश झाल्याने जमिनी मृत होत चालल्या असुन कडक होत आहेत.
त्यामुळे जमिनीचा पोत बिघडुन जमिनी नापिकी होणे, पिकांची उत्पादकता कमी होणे, उत्पादीत शेतमालाची प्रत खालावणे,मशागतीचा खर्च वाढणे,रासायनीक निविष्ठांच्या खरेदीमुळे उत्पादन खर्च वाढणे इत्यादी दुष्परिणाम दिसून येत आहेत.
त्यामुळे मानव व पशुपक्षी यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होवुन जैव विविधतेस धोका निर्माण होत आहे. मानवी शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उच्च दर्जाची, सकस आणी विषमुक्त फळे, भाजीपाला आणि अन्नधान्य मागणीमध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे नैसर्गीक व सेंद्रीय शेतीचे महत्व अधोरेखीत झालेले आहे. वरील दुष्परिणाम लक्षात घेता नैसर्गीक व सेंद्रीय शेतीस प्रोत्साहन देणे ही काळाची गरज झालेली आहे. त्यानुसार शासनाने राज्यात डॉ. पंजाबराव देशमूख जैविक मिशनची व्याप्ती राज्यभर वाढविली आहे. आणी या मिशनला डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गीक शेती मिशन असे नाव देण्यात आलेले आहे. हे मिशन 2022-23 ते 2027-28 या कालावधीकरिता राबविण्यासाठी या मिशन अंतर्गत 1083.29 कोटी इतक्या तरतूदीस राज्य शासनाने मान्यता दिली आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गीक शेती मिशन बाबत माहिती-
या मिशन चे मुख्यालय अकोला येथे असुन कार्यक्षेत्र संपुर्ण महाराष्ट्र आहे. या मिशनची संस्था नोंदणी अधिनियम 1860 अन्वये धर्मादय आयुक्त यांचेकडे नोंदणी करण्यात आलेली आहे. या मिशन ची स्थापना शासन निर्णय दि 16.10.2018 नुसार करण्यात आलेली आहे.
मा.आयुक्त कृषी हे या मिशनच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आहेत. कृषी संचालक आत्मा हे या मिशनचे उपाध्यक्ष आहेत. आणी प्रकल्प संचालक, डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गीक शेती मिशन अकोला हे या मिशनचे सदस्य सचिव आहेत.
जिल्हा स्तरावर जिल्हा मिशन समितीची रचना-
अध्यक्ष- प्रकल्प संचालक आत्मा
सहअध्यक्ष- जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी
सदस्य- जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ
सदस्य सचिव- प्रकल्प उपसंचालक/तंत्र अधिकारी(सेंद्रीय शेती)
डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गीक शेती मिशन या योजनेचा लाभ कुणाला मिळेल-
50 हेक्टर क्षेत्राचा गट असणारे गटातील शेतकरी यांना या योजनेचा लाभ मिळेल.
या योजनेत 50 हे.क्षेत्राचा 1 गट याप्रमाणे 10 गटांचा समूह व या समुहाची शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणे किंवा सहकार कायद्या अंतर्गत शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) स्थापन करणे तसेच सेंद्रीय शेती प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. सेंद्रीय शेतीचे प्रमाणीकरण होण्यासाठी तीन वर्षे लागतात.
एका शेतकऱ्यास किती हेक्टर क्षेत्रापर्यंत लाभ मिळेल-
एका शेतकऱ्यास कमाल २ हेक्टर क्षेत्रापर्यंत लाभ मिळेल.
डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गीक शेती मिशन मध्ये कोणते घटक राबविण्यात येतात-
या मिशन मध्ये खालील एकुण 7 घटक राबविण्यात येतात-
i) नैसर्गीक सेंद्रीय शेती क्षेत्र विस्तार व शेतकरी प्रशिक्षण- तीन वर्षामध्ये एकुण प्रती हेक्टर 7000 रु. अनुदान
ii) शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणे व त्यांचे प्रशिक्षण-तीन वर्षात एकुण रु. 1 लाख प्रती कंपनी.
iii) जैविक निविष्ठा संसाधन केंद्र- शेतकरी उत्पादक कंपनी स्तरावर आणी गट स्तरावर -
शेतकरी उत्पादक कंपनी साठी खर्चाच्या 75 टक्के, कमाल रु.5 लाख आणी गटासाठी 75 टक्के कमाल रु. 1लाख अनुदान.
iv) शेतकरी उत्पादक कंपनीस पणन सुविधेसाठी अर्थसाह्य.- वाहन खरेदी किंवा विक्री केंद्र बांधण्यासाठी कंपनीला खर्चाच्या 75 टक्के, कमाल रु.4.50 लाख अनुदान. प्रसिद्धी विक्री मेळावे यासाठी रु.0.50 लाख प्रती कंपनी अनुदान. तसेच समूह संकलन केन्द्र उभारण्याकरीता रु. 10 लाख अनुदान.
v)प्रकल्प व्यवस्थापन कक्ष
vi) कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षण व प्रात्यक्षिके- रु. 25 लाख प्रती कृषी विज्ञान केंद्र.
vii) कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून संशोधन व प्रशिक्षण- रु. 500 लाख प्रती विद्यापीठ अनुदान.
या मिशनमध्ये 50 हेक्टर क्षेत्राचा एक गट असे 10 गटांचा एक समूह म्हणजेच 500 हेक्टर क्षेत्राचा एक समूह आणी या समूह स्तरावर शेतकरी उत्पादक कंपनी किंवा सोसायटी. आणी या 500 हेक्टर क्षेत्रातील सर्व शेतकरी यांना एकुण किती अनुदान मिळते. म्हणजेच एका समूहाला किती अनुदान मिळते?
एका समूहाला तीन वर्षात ६६ लाख रु अनुदान खालील प्रमाणे मिळते.
असे एका समुहा साठी तीन वर्षात वरील पाच बाबींसाठी मिळून एकुण 66 लाख इतके अनुदान देण्यात येते.
१. नैसर्गिक सेंद्रिय शेती-क्षेत्र विस्तार व शेतकरी/अधिकारी/कर्मचारी प्रशिक्षण
२. शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणे व त्यांचे प्रशिक्षण- (रु. १ लाख प्रति कंपनी)
या योजनेत शेतकरी यांना अनुदानास पात्र होण्यासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत-
i) शेतकरी हे नैसर्गीक/सेंद्रीय शेतीसाठी स्थापीत गटाचा सदस्य असणे आवश्यक आहे.
ii) नैसर्गीक/सेंद्रीय शेतीसाठी स्वेच्छेने तयारी दर्शवुन त्याबाबतचे प्रतिज्ञापत्र देणे
iii) नैसर्गीक/सेंद्रीय शेतीसाठी स्वत: किंवा कुटुंबाने धारण केलेले क्षेत्र निश्चीत करुन जिओ-टैगींग करणे
iv) शेतकरी प्रशिक्षणात सहभागी होणे
v) माती परिक्षण करुन घेणे
vi) नैसर्गीक/सेंद्रीय शेतीसाठी निवडलेल्या क्षेत्रात रासायनीक खते, कीटकनाशके आणी सेंद्रिय शेतीसाठी वर्ज्य निविष्ठांचा वापर बंद करणे
vii) समुहस्तरावर स्थापीत शेतकरी उत्पादक कंपनी/सोसायटीचा भागधारक होणे
viii) नैसर्गीक/सेंद्रीय शेतीसाठी निवडलेल्या क्षेत्राची सेंद्रीय प्रमाणीकरणासाठी नोंदणी करणे
ix) नैसर्गीक/सेंद्रीय प्रमाणीकरणासाठी नियुक्त यंत्रणेस सर्व प्रकारचे सहकार्य करणे
x) नैसार्गीक/सेंद्रीय प्रमाणीकरणासाठी आवश्यक सेंद्रीय शेतीच्या कामाच्या नोंदी शेत नोंदवही मध्ये घेणे.
xi) हिरवळीच्या खता साठी धैंचा/ताग लागवड
xii) नैसर्गीक/सेंद्रीय शेतीसाठी निश्चीत केलेल्या क्षेत्राभोवती चर काढुन अन्य क्षेत्रातून पाणी वाहुन येऊ नये याची व्यवस्था करणे
xiii) जैविक बीजप्रक्रिया करणे
xiv) बायोडायनैमिक /सुधारीत पद्धतीने सेंद्रीय खत निर्मिती साठी डेपो लावणे
xv) बीजामृत जीवामृत आणी वनस्पतीजन्य किडनाशक व रोगनाशक औषधी द्रव्य तयार करण्यासाठी प्लास्टीक ड्रम खरेदी करणे, निर्मिती करणे व वापर करणे.
xvi) शेताभोवताली जैविक कुंपण तयार करणे
xvii) समूहस्तरावर स्थापीत शेतकरी उत्पादक कंपनी/सोसायटी मार्फत नैसर्गीक/सेंद्रीय शेतीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील शेतमालाची विक्री करणे
अधिक माहितीसाठी-
मार्गदर्शक सुचना दि. 17.8.2023
प्रशिक्षण संख्येत बदल बाबत पत्र दि. ८-१-२४
निविष्ठा निर्मिती बाबत सुधारीत सुचना 19.1.24
जैविक निविष्ठा संसाधन केन्द्र स्थापन करणे बाबत मार्गदर्शक सूचना दि. २-२-२४
जैविक निविष्ठा संसाधन केन्द्र स्थापन करणे बाबत सुधारीत मार्गदर्शक सुचना दि. २८-२-२०२४
जैविक निविष्ठा संसाधन केंद्र बाबत सुचना दि. १४-३-२४
प्रशिक्षण बाबत पत्र दि. ३०-४-२४
शेतकरी उत्पादक कंपनी समभाग बाबत सुधारीत सूचना २८-१०-२०२४
---x ---
राज्यात नैसर्गीक/सेंद्रीय शेतीबाबत कोणत्या योजना आहेत-
केंद्र पुरस्कृत योजना 3 आहेत-
1) परंपरागत कृषी विकास योजना
2) राष्ट्रिय नैसर्गीक शेती अभीयान
शेतकरी यांना बाहेरुन निविष्ठा खरेदी पासून मुक्त करणे, उत्पादन खर्चात बचत करुन शेतकरी यांचे उत्पन्न वाढविणे अशा स्वतंत्र पर्यायी शेती पद्धतीस चालना देणे हे उद्दीष्ट आहे. सदर योजना गट आधारीत असुन 50 हेक्टर क्षेत्राचा एक गट या प्रमाणे 10 गट स्थापन करुन या 10 गटांची शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करावयाची आहे. प्रथम वर्षी निवड केलेल्या गटात निवड केलेल्या शेतकरी यांची शेतिशाळा घ्यावयाची असुन त्यामधील इच्छुक शेतकरी यांच्या गटास पुढील 3 वर्षे योजनेचा लाभ द्यावयाचा आहे. एकदा निवड केलेल्या गटास/शेतकर्यास 4 वर्षे लाभ द्यावयाचा असुन रु.26720 प्रती हेक्टर अनुदान 4 वर्षात दिले जाणार आहे.
3) परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत मोठ्या क्षेत्राचे प्रमाणीकरण (Large Area Certification- PKVY component)-
परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत हा घटक मंजूर आहे. पारंपारिक सेंद्रीय शेती पद्धतीमध्ये यापूर्वी रासायनीक निविष्ठांचा वापर केला नसलेल्या मोठ्या क्षेत्राचा समावेश, वैयक्तीक इच्छुक शेतकरी किंवा लहान शेतकरी गट, पिकेव्हीवाय गटांमध्ये समाविष्ट नसलेले मोठे शेतकरी यांना या योजनेमध्ये फक्त प्रमाणीकरणाची सुविधा तसेच उर्वरीत अंश विश्लेषणासाठी 100 हेक्टर क्षेत्रामधून 3 शेतमालाचे नमुने तपासणीसाठी अर्थसाह्य उपलब्ध आहे. या योजनेअंतर्गत रु.6000 प्रती हेक्टर अर्थसहाय्य देय आहे.
याव्यतिरिक्त इतर बाबी म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणे व त्यांचे प्रशिक्षण, शेतकरी उत्पादक कंपनी व गटस्तरावर जैविक निविष्ठा केंद्र, शेतकरी उत्पादक कंपनीस पणन सुविधेसाठी अर्थ सहाय्य या बाबी डॉ पंजाबराव देशमुख नैसर्गीक शेती मिशन मधून राबविण्यात येणार आहेत.