Total Pageviews

POCRA 2.0

POCRA 2.0 - नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२

प्रकल्पाचा उद्देश-

शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी सक्षम करणे व कृषी आधारीत उपजीविकेची साधने उपलब्ध करून शेती किफायतशीर करणे. 

टप्पा-२ ची अंमलबजावणी कधीपासून-   

२०२५-२६ पासून पुढील ६ वर्ष अंमलबजावणीस ८-७-२०२५ च्या शासन निर्णयानुसार मान्यता 

प्रकल्पाची गुंतवणूक किती-

एकूण ६००० कोटींचा प्रकल्प - जागतिक बँकेचे अल्प व्याजदराचे कर्ज -४२०० कोटी. राज्य शासनाची स्वनिधीतून गुंतवणूक- १८०० कोटी. 

किती जिल्ह्यात प्रकल्पाची अंमलबजावणी -

राज्यातील खालील २१ जिल्ह्यातील ७२०१ गावांमध्ये अंमलबजावणी -

छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड 

लातूर नांदेड परभणी हिंगोली धाराशिव 

बुलढाणा अकोला वाशीम अमरावती यवतमाळ 

वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली 

नाशिक जळगाव 

लाभ कुणाला मिळणार-

५ हेक्टरपर्यंत जमीन धारणा असलेले वैयक्तिक शेतकरी, (बियाणे उत्पादन या घटकासाठी जमीन धारणा मर्यादेची अट नाही )

भूमिहीन कुटुंब, 

शेतकरी गट, 

स्वयंसहायता गट, 

शेतकरी उत्पादक कंपनी. 

लाभार्थी निवड प्राधान्यक्रम कसा आहे  - 
अनुसूचित जाती व जमाती, महिला, दिव्यांग, सर्वसाधारण लाभार्थी 

कोणत्या घटकांसाठी अनुदान आहे-














अर्ज कसा करावा - 






अनुदान कसे जमा होणार-
अनुदान थेट लाभार्थीच्या आधार लिंक्ड बँक खात्यात जमा होणार. 


अधिक माहितीसाठी शासन निर्णय-